प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा : यशोमती ठाकूर - Yashomati Thakur tweet on Sharad Pawar statement on Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा : यशोमती ठाकूर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 डिसेंबर 2020

राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी टि्वट करून आघाडी धर्म पाळा, असे म्हटलं आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केला होता. यावर राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी टि्वट करून आघाडी धर्म पाळा, असे म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी हे टि्वट केलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये यशोमती ठाकूर म्हणतात,"महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना आवाहन करते की महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं असल्याच काँग्रेसच्या नेतृत्त्वावर भाष्य करणं टाळा. प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा"

हेही वाचा : वर्षभरात भाजपला दोनदा सुतक..शिवसेनेचा टोला 
 मुंबई : पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव झाला आहे. यावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' तून भाजपवर टीका करण्यात आली आहे. "वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल," अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत, असे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख