जयंतराव, आपण एकत्र लढू आणि कॉग्रेसची जिरवू :  भाजपच्या माजी आमदाराची आँफर

निवडणूक सोबत लढवू. मात्र, आघाडीत असलेल्या काँग्रेसला आमचा विरोध राहील
1vilasrao_jagtap_40mla_jath.jpg
1vilasrao_jagtap_40mla_jath.jpg

जत : गेल्या दोन वर्षांपूर्वी मी स्वतः जत तालुक्यातील अंकलगी येथे विस्तारित म्हैसाळ योजना मांडली. मात्र, त्याला पाण्याची उपलब्धता मिळविण्यासाठी दोन वर्षे गेली. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी या योजनेला मंजुरी घ्या, येणारी निवडणूक सोबत लढवू. मात्र, आघाडीत असलेल्या काँग्रेसला आमचा विरोध राहील,'' अशी ठाम भूमिका भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील Jayantrao Patil यांच्या सत्काराच्या वेळी बोलून दाखवली.

या वक्तव्याने जत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून माजी आमदार विलासराव जगताप Vilasrao Jagtap यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेचा विषय रंगला आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी वंचित ६५ गावांसाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांची सांगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन सत्कार करत आभार मानले. शिवाय आता बराच काळ लोटला असून ही योजना तत्काळ मार्गी लावा. आता ६५ गावांतील शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली आहे. २०२४ पर्यंत योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा, अशी मागणी ही जगताप यांनी केली. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हा सर्वत्र चेष्टेचा विषय
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘‘सध्या योजनेला पाण्याची उपलब्धता करून थांबून चालणार नाही. याला तांत्रिकदृष्ट्या व प्रशासकीय मंजुरी देऊन अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून प्रत्यक्ष त्याला मुहूर्तस्वरूप प्राप्त करावे लागेल. शिवाय स्व. राजाराम बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ही योजना मार्गी लावतील, असा आशावाद ही व्यक्त केला.’’

सर्व शक्ती पणाला लावू..
जत तालुक्यासाठी सहा टीएमसी पाणी मिळवणे शक्य नव्हते. जतकरांच्या सततच्या मागणीमुळे मंत्रालय स्तरावर समिती नेमून याचा जीआर काढला. ही योजना तत्काळ मार्गी लावून जतला पाणी देणे हे स्व. राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करू. या सर्व प्रक्रियेला वेळ लागेल. मात्र, ती पूर्ण करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com