राज्यमंत्री भरणे यांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत आहे का नाही?

गंभीर बाब म्हणजे भरणे यांनी दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही.
Word of Minister of State Bharane has any value in the government : Vikram Dhone
Word of Minister of State Bharane has any value in the government : Vikram Dhone

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकाचे काम मार्च २०२१ पर्यंत सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले होते. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होऊनही त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे भरणे यांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या प्रकरणी पालकमंत्री भरणे यांनी स्वतःच्या शब्दाची किंमत घालवून घेऊ नये. महिनाभरात स्मारकाचे भूमिपूजन करून काम मार्गी लावावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.  (Word of Minister of State Bharane has any value in the government : Vikram Dhone)

अहिल्यादेवी होळकर यांची उद्या (शुक्रवार, ता. १३ ऑगस्ट) पुण्यतिथी आहे. त्यासंदर्भाने ढोणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षी याचदिवशी धनगर विवेक जागृती अभियानाने अहिल्यादेवींचे स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्मारक शासकीय निधीतून करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरच्या काळात ठोस तरतूद झालेली नाही, असे ढोणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मंत्री उदय सामंत, पालकमंत्री भरणे यांनी विद्यापीठाला भेटी देऊन स्मारक होणार असल्याच्या घोषणा केल्या आहेत. त्याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, म्हणून धनगर विवेक जागृती अभियानाने सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ता. २५ जानेवारी २०२१ रोजी बेमुदत उपोषण केले होते. त्यादिवशी रात्री पालकमंत्री भरणे यांनी उपोषकर्त्यांशी चर्चा करून मार्चअखेर स्मारकाचे काम सुरू करण्याचा जाहीर शब्द दिला होता. त्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले. त्यांच्या आश्वासनानुसार चार महिने अधिक झाले आहेत, तरीही अद्याप स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. यातील गंभीर बाब म्हणजे भरणे यांनी दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही, याची जाणीव त्यांना दिलेल्या निवेदनात करून दिल्याचे ढोणे यांनी सांगितले.

...मग अहिल्यादेवींच्या स्मारकाला निधी का नाही 

लोकप्रतिनिधी म्हणून दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर मतदारसंघात शेकडो कोटींची कामे सुरू आहेत. कोणताही निधी कमी पडणार नसल्याची विधाने ते सातत्याने करत असतात. मात्र, सोलापूरचे पालकमंत्रीपद असूनही अहिल्यादेवींच्या स्मारकाला ते तीन-चार कोटींची तरतूद का करून घेऊ शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. या प्रश्नी त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्याचे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com