'सोचा था लाईफ सेट हो जायेगी, पर आपने जगह नहीं दी'...काँग्रेस आमदाराची प्रेमकहाणी - A woman allegedly died by suicide at the residence of Congress MLA Umang Singhar | Politics Marathi News - Sarkarnama

'सोचा था लाईफ सेट हो जायेगी, पर आपने जगह नहीं दी'...काँग्रेस आमदाराची प्रेमकहाणी

वृत्तसंस्था
बुधवार, 19 मे 2021

सोनिया भारव्दाज असं या 39 वर्षीय महिलेचं नाव आहे.

भोपाळ : 'मैंने अपनी तरफ से सबकुछ किया...आपके साथ मैंने सोचा था लाईफ सेट हो जाएगी...कोशिश की, पर आपने जगह नहीं दी...! काँग्रेस आमदाराच्या बंगल्यात आत्महत्या केलेल्या त्यांच्या मैत्रिणीने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातील मजकुरावरून दोघांमधील प्रेमकहाणी समोर आली आहे. आमदाराच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी तिचे प्रयत्न होते, असे या चिठ्ठीतून स्पष्ट झालं आहे. (A woman allegedly died by suicide at the residence of Congress MLA Umang Singhar)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमध्ये आमदार उमंग सिंघार (Umang Singhar) वनमंत्री होते. त्यांच्या बंगल्यात ही घटना घडली आहे. सोनिया भारव्दाज (Sonia Bhardwaj) असं या 39 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही घटना घडली त्यावेळी सिंघार हे आपल्या मतदारसंघात गेले होते. ही महिला मागील काही दिवसांपासून त्यांच्या शाहपुरा येथील खासगी बंगल्यात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला मुळची अंबाला येथील बलदेव नगरमध्ये राहणारी होती.

हेही वाचा : 'ब्लॅक फंगस'चे संकट; देशातील दोन राज्यांकडून महामारी घोषित

मिळालेल्या माहितीनुसार, सिंघार व सोनिया यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळं त्या अनेकदा यापूर्वीही या बंगल्यात राहिल्या आहेत. घटना घडली त्यावेळी बंगल्यात नोकर व त्याची पत्नी होती. रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सोनिया यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नोकराच्या पत्नीने अनेकदा दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं नोकरीने सिंघार यांना याबाबत कळविले. त्यांनी एकाला तिथे पाठविले तेव्हा सोनिया यांनी गळफास घेतल्याचे समोर आलं. सिंघार यांनीही सोनिया आपली चांगली मैत्रीण असल्याचे कबुली दिली आहे.

काय लिहिलं आहे चिठ्ठीत?

सोनिया यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेची चिठ्ठी समोर आली आहे. 'अब मैं और सहन नहीं कर सकती...मैंने अपनी तरफ से सबकुछ किया, पर उमंग का गुस्सा बहुत ज्यादा है...मुझे डर लगता है...वो मुझे अपनी लाइफ में जगह नहीं देना चाहता...उसकी किसी भी चीज को टच करो तो उसको बुरा लगता है...उमंग आपके साथ मैंने सोचा था लाइफ सेट हो जाएगी...कोशिश की एडजस्ट करने की, पर आपने जगह नहीं दी मुझे अपनी लाइफ में...,' असं चिठ्ठीत लिहिलं आहे.

मुलगा म्हणतो सिंघारच माझे पालक

सोनिया यांना एक मुलगा आहे. आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सिंघार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण सोनिया यांच्या मुलाने हा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. कोणताही पुरावा नसताना हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी किंवा माझ्या आजीने सिंघार दोषी असल्याबाबत आपल्या जबाबात म्हटलेले नाही. आई मृत्यूनंतर तेच आमची काळजी घेत आहेत. ते आता माझे पालक आहेत, असे सोनिया यांच्या मुलाने सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख