Will your mobile number be eleven digits; What is the truth ... | Sarkarnama

तुमचा मोबाइल क्रमांक अकरा अंकी होणार का ; काय आहे सत्य...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

लॅडलाइनवरून मोबाइलवर फोन करण्यासाठी ‘0’ लावण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मोबाईल क्रमांक 10 अंकांऐवजी 11 अंकी होणार नसल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. 

पुणे : देशभरातील मोबाइल क्रमांक हे आता अकरा अंकी होणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी नुकतेच दिले होते. या वृत्ताचे खंडण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सांगितले आहे, की लॅडलाइनवरून मोबाइलवर फोन करण्यासाठी ‘0’लावण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मोबाईल क्रमांक 10 अंकांऐवजी 11 अंकी होणार नसल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. 

पण, मोबाइल क्रमांक हे दहा अंकी का असतात, याबाबत जाणून घेऊन या. आपल्या देशातील मोबाइल क्रमांक दहा अंकी असण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या आहे. तर दुसरे कारण हे सरकारची राष्ट्रीय क्रमांक योजना म्हणजे एनएनपी. जर मोबाइल क्रमांक हा फक्त एक अंकी असता तर 0 पासून ते नऊपर्यंत 10 क्रमांक वेगवेगळे होऊ शकतात, त्याचबरोबर या क्रमांकाचा वापर फक्त 10 व्यक्तीच करू शकतील. जर दोन अंकी क्रमांक असेल तर 0 पासून 99 पर्यंत फक्त 100 क्रमांक तयार होऊ शकतील. त्यांचा उपयोग फक्त शंभर व्यक्तीच करू शकतील. यामुळे मोबाइल क्रमांक दहा अंकी असतात. 

त्यामुळे जर दहा अंकी मोबाइल क्रमांक असेल तर एक हजार कोटी वेगवेगळे क्रमांक तयार होऊ शकतात. त्यामुळे एक हजार कोटी ग्राहकांना मोबाइल क्रमांक देता येईल. यासाठी मोबाइल क्रमांक हा 10 अंकी असतो. 2003 पर्यंत नऊ अंकी मोबाइल क्रमांक होते. लोकसंख्या वाढल्यानंतर ते दहा अंकी करण्यात आले.  देशात अधिक मोबाइल क्रमांक उपलब्ध करण्यासाठी 10 ऐवजी 11 अंकी क्रमांक होणार आहे. 10 वरून 11 अंकी क्रमांक झाला तर देशात मोबाइलची संख्या वाढेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत ट्रायने स्पष्टीकरण दिले आहे. मोबाइल क्रमांक हे 10 अंकी असतील, असे ट्रायने म्हटले आहे. मोबाइल क्रमांक 11 अंकी होणार ही अफवा असल्याचे ट्रायने म्हटले आहे. डायलिंग पॅटर्नमध्ये बदल झाला तर ‘0’लावल्यामुळे मोबाइल सेवेसाठी अतिरिक्त 25 कोटी 44 लाख क्रमांक वाढतील, असे ट्रायने सांगितले आहे.  

 

 

ही बातमी वाचा : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलविले  

न्यूयॅार्क  : अमेरिकेत भडकलेला वणवा अद्याप सुरूच आहे. जॅार्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अनेक आंदोलक हे उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर उतरले आहेत.
रविवारी सुरू झालेल्या या आंदोलनाची धग आता व्हाईट हाऊसपर्यंत पोहचली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलविण्यात आले आहे. वॉशिंगटन, न्यूयॉर्क, न्यू जर्सी या शहरासह अमेरिकेतील चाळीस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेत मिनेपॅालिस येथील जॅार्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू पोलिस ठाण्यात झाला होता. पोलिसांनी जेव्हा या व्यक्तीला पकडले होते तेव्हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मिनेपॅालिस शहरात आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर या आंदोलनाची आस अमेरिकेच्या सर्व राज्यात पसरली आहे. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख