शिक्षक भरतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार :  प्रा. सचिन ढवळे - Will try to lift the ban on teacher recruitment Prof. Sachin Dhawale | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्षक भरतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार :  प्रा. सचिन ढवळे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

विना अनुदानीत शाळा महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत काटेकोर राहण्यासाठी पाठपुरावा करण्याचा वचननामा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी आज जाहीर केला.

पुणे : पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी 'स्वतंत्र पदवीधर विकास महामंडळ' स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्याबरोबरच विना अनुदानीत शाळा महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत काटेकोर राहण्यासाठी पाठपुरावा करण्याचा वचननामा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी आज जाहीर केला.

हिंगोली येथे पत्रकार परिषदेत प्रहारचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अॅड. विजय राऊत, युवक जिल्हाध्यक्ष रॉबर्ट बांगर, बेरोजगारांचे नेते चांगदेव गिते यावेळी उपस्थित होते. अंशकालीन निदेशक अर्थात (कला , क्रीडा , कार्यानुभव ) शिक्षक यांना कोणत्याही पटसंख्येची अट न ठेवता नियुक्ती देवून कायम करण्याबाबत धोरण राबविणार, विनाअनुदानित, अनुदानित व खाजगी शाळा महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार, कोचिंग क्लासेस लवकरात लवकर सुरु करून संचालकांना कोरोना काळात शिकवणी वर्ग बंद असल्या कारणाने झालेल्या नुकसानीमुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी योग्य ते धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) पूर्व नियोजित वेळापत्रक निश्चित करून निकाल ४५ दिवसांत जाहीर करण्यास प्रयत्न करणार तसेच लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत यासाठी प्रयत्नशील राहणार. राज्यात सध्या पदवीधर निवडणुकीचे धमासान चालू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू असताना आता प्रत्येकाने आपाला जाहिरनामा प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित लेख