शेतकरी त्याचा माल काय हेलिकॉप्टरमधून नेणार का ? राहुलबाबांचा मोदींना सवाल  - Will the farmer take his goods by helicopter to sell? Rahul Baba's question to Modi | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी त्याचा माल काय हेलिकॉप्टरमधून नेणार का ? राहुलबाबांचा मोदींना सवाल 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजप, कॉंग्रेससह सर्वच पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत.

पाटणा : मोदीजी मला सांगा, की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला त्याचा माल विकण्यासाठी काय हेलिकॉप्टरमधून नेणार का ? असा सवाल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. 

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजप, कॉंग्रेससह सर्वच पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांबरोबर मुख्यमंत्री नितीशकुमार, राजदचे नेते तेजस्वी यादव, लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान आदी नेत्यांनी बिहार पिंजून काढला आहे.

येथे जी लढत आहे ती भाजप-जेडीयू आणि राजद-कॉंग्रेसमध्ये. नितीशकुमार यांच्यावर तर पासवान आणि तेजस्वी यादव हे तुटून पडताना दिसत आहे. 

नितीशचाच्या आप थक गये अब खुर्ची छोडा असा सवाल तेजस्वी यादव तर प्रत्येक सभेत सवाल करीत आहेत. तर दुसरीकडे पासवान हे नितीशकुमारांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही असे सांगत आहेत. 

आज राहुल गांधी यांनी बिहारमध्ये सभा घेतली. या सभेत बोलताना राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांना शेतकरी प्रश्‍नावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले, की मोदी सरकारने जी कृषि विधेयके आणली आहेत ती देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहेत. मोदीजी म्हणतात, की शेतकऱ्याला मुक्त केले म्हणून. कसे मुक्त केले हे मात्र ते सांगत नाहीत. 

ते म्हणतात, शेतकरी त्याचा शेतातील माल देशात आता कुठेही विकू शकतो. तशी त्याला मूभा देण्यात आली आहे. शेतकरी त्याचा शेतातील माल काय हेलिकॉप्टरमधून विकायला नेणार की काय ? की रस्त्याने जाणार. रस्त्याने जायचे तर बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत ? 

राहुल गांधी हे बिहारच काय देशात कुठेही सभा किंवा पत्रकार परिषद असो. ते मोदींवर कडाडून हल्ला चढवित असतात. बिहारच्या निवडणुकीतही राहुल गांधी यांनी मोदींना सोडले नाही. बिहारचे प्रश्‍न, नितीशकुमारांची राजवट, तेथील समस्यांबाबत प्रश्‍न उपस्थित करून मोदींबरोबर नितीशकुमारांनाही खडे बोल सुनावत आहेत. आजही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मोदींची खिल्ली उडविली. 
हे ही वाचा : 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख