राऊतांनी मुख्यमंत्र्यांना का ? विचारले...महाविकास आघाडी काय म्हणते..?

राज्यातील उद्योगक्षेत्राबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणतात की धोरणाची अनिश्तितता असेल तर गुंतवणुक येणार नाही.
Sanjay Raut Uddhav Thackeray.jpg
Sanjay Raut Uddhav Thackeray.jpg

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत 'सामना'चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा दुसऱा प्रोमो आज प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मुलाखत ता. २५ व २६ जुलै रोजी 'सामना'च्या वेबसाईटवरून (www.saamana.com) प्रसारीत करण्यात येणार आहे.  

या मुलाखतीत राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विविध प्रश्न विचारलेले दिसतात, राष्ट्रभक्ती काय म्हणते, या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणतात की राष्ट्रभक्ती सगळ्या देशाची सारखी असली पाहिजे, माझी आहे. तसेच मी निराशावादी नाही, मी कोणालाही निराशावादी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील उद्योगक्षेत्राबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणतात की  धोरणाची अनिश्तितता असेल तर गुंतवणुक येणार नाही. 

राज्यात स्थापन झालेली महाविकास आघाडी काय म्हणते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला २५ तारखेला समजणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॅान मुलाखत संजय राऊत यांनी घेतली होती. या मुलाखतीत पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना, भाजपची भूमिका, सध्याच्या महाविकास आघाडीचे हेडमास्तर कोण आहे, अशा विविध प्रश्नांची सडेतोड व परखड उत्तरे दिली होती. या मुलाखतीत अनेक गोप्यस्फोट पवार यांनी केले होते. आता मुख्यमंत्री ठाकरे आपल्या मुलाखतीत काय सांगतात, हे आपल्याला लवकरच २५ व २६ तारखेला समजणार आहे.

Edited by : Mangesh Mahale 

हेही वाचा  : चारशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष या मंत्र्यामुळे वाचणार.... 

पुणे : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील ४०० वर्षापूर्वीचा वटवृक्ष वाचणार आहे. याबाबतचे टि्वट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग या वटवृक्षाचे जतन करणार असून महामार्गाच्या कामात काहीसा बदल करण्यात येणार आले, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी टि्वटरवरून दिली आहे. सांगली जिल्ह्यातील भोसे गावातील 400 वर्षापूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले होते. 

ऐतिहासिक वारसा असलेला हा वृक्ष वाचवण्यासाठी ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमींनी लढा उभारला होता. त्या लढ्याला मंत्री आदित्य ठाकरे यांचे बळ मिळाले होते.  रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज -सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर भोसे गावाजवळ एक चारशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड आहे. या परिसरातील हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. या झाडावर पक्षांची घरटी आहेत. या परिसरातील एक ऐतिहासिक वारसा म्हणून या झाडाकडे बघितले जाते. त्यामुळे महामार्ग होत असताना हे झाड वाचावे, अशी लोकांची भूमिका आहे. याबाबत ग्रामस्थांनी खासदार संजय पाटील यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबतच्या आपल्या भावना पोहोचवल्या होत्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com