विधानसभा अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या मनातील नाव कोणते?  

विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होणार आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-02T082725.800.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-02T082725.800.jpg

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  हे पद काँग्रेसकडे असून, अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. Who will be the Speaker of the Assembly Sharad Pawar

5 आणि 6 जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यावी अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केली आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होईल आणि विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होणार आहे. 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत एकमत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल स्पष्ट केले. ‘महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे दिल्याने या निवडणुकीतही त्यांचाच उमेदवार असेल,’ असे पवार यांनी सांगितले. या पदाच्याही निवडणूक घेण्याबाबत आघाडीतील तिन्ही पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे, हेही पवार यांनी स्पष्ट केले.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे ही निवडणूक या अधिवेशनात घेण्याच्या काँग्रेसच्या आग्रहावर आघाडीत एकमत झाले आहे. तरीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पत्र आणि भाजपच्या नेत्यांच्या मागण्यांमुळे उलटसुलट चर्चा रंगत आहे. या अनुषंगाने पवार यांनी भूमिका मांडली.

मुख्यमंत्र्याशी कोणतीही राजकीय चर्चा नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ठाकरे यांच्यासमवेतच्या बैठकीत केवळ विकासाचे मुद्दे होते. काही प्रश्नांवर लवकर निर्णय घेतले पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले. ठाकरे -पवार यांच्या बैठकीवरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चा होत्या, त्या निराधार असल्याचे ते म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यात दलित मतदारांना पक्षाकडे वळवण्याची सूचना केली होती. त्यानुसार नितीन राऊत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जाते. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com