`सीरम`च्या अदर पूनावालांना धमकी देणारा `वाझे` कोण?

सिरमच्या लशीसाठी अनेकजण अधीर
adar poonawala
adar poonawala

मुंबई : कोरोना लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पूनावाला यांना धमक्या मिळत असल्याचे त्यांनीच सांगितल्याने हे धमकी देणारा `वाझे` कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. भारतातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकविण्यासाठी त्यांच्या अॅंटिलिया निवासस्थानी स्फोटके ठेवण्यामागे पोलिस दलातीलच सचिन वाझे असल्याचे नंतर स्पष्ट झाले. तसेच आता पूनावाला यांना धमक्या देणारा वाझे कोण, याचे उत्तर आता सरकारी यंत्रणा देणार का याची उत्सुकता आहे. 

आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी गौप्यस्फोट केले. ते  म्हणाले की भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्राझेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. त्यांच्या  आम्हाला लसपुरवठा करणे योग्य ठरणार नाही, अशी ही मंडळी सांगत असतात. सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लशीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने सारेच पूनावाला यांच्यावर दबाव आणत आहेत. 

पूनावाला यांना सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांना दोन दिवसांपूर्वीच त्यांना वाय सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा केलीय. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारतात सीआरपीएफच्या (CRPF) जवानांकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. मात्र त्याआधीच लंडनमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. आणखी काही दिवस ते तेथेच वास्तव्य करणार आहेत. त्यांची पत्नी आणि मुलांसह ते तेथे राहणार आहेत. ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याआधीच आठ दिवसांपूर्वी अदर पूनावाला लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सिरमची लस उत्पादनाची क्षमता जुलैपर्यंत दरमहा 10 कोटी डोसपर्यंत जाऊ शकेल. पुढील सहा महिन्यांत सिरमची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच अब्ज डोसवरुन 3 अब्ज डोसवर नेण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावालांनी म्हटले आहे. 

सर्व जबाबदारी माझ्याच खांद्यावर असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. सुरवातीला आपण मोठे काम करत असल्याची भावना होती. अभिमान वाटत होता. मात्र अश्रू आणि घाम गाळूनही सिरमबद्दल नकारात्मक पद्धतीने बोलले जात असल्याची खंत  त्यांनी व्यक्त केली. सिरमच्या कामाचे कौतुक आणि पाठिंबा मिळायला हवा होता. प्रत्यक्षात उलटेच घडत असून आम्हालाच दोष देऊन खलनायक ठरविले जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. मी नफा मिळविण्यासाठी काही चुकीचे केलेले नाही. इतिहासच माझ्या कामाचे योग्य मूल्यमापन करेल, अशी भावना त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com