WHOने रेमडेसिविरला औषधांच्या यादीतून केलं  बाद.. - who suspends remdesivir from list of medicines after warning against use on-covid19 patients | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

WHOने रेमडेसिविरला औषधांच्या यादीतून केलं  बाद..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

रेमडेसिविर कोरोनासाठी गुणकारी आहे, असा कुठलाही पुरावा नसल्याचे WHOने स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली : कोरोना रूग्णांसाठी रेमडिसिविर  remdesivir इंजेक्शनसाठी सध्या धावपळ सुरू आहे, पण जागतिक आरोग्य संघटनेनं WHOने  रेमडिसिविरला remdesivir औषधांच्या यादीतून वगळले आहे. रेमडेसिविर कोरोनासाठी गुणकारी आहे, असा कुठलाही पुरावा नसल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेनं WHOने स्पष्ट केलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिले आहे.

आम्ही रेमेडिसविर हे औषध PQ प्रीक्वालिफिकेशन लिस्टमधून बाद केलं आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी एकाही देशाने हे औषध खरेदी करु नये, असे  असंही त्यांनी म्हटलं आहे. WHO चे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी एका इमेलला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे. कोरोनासाठी हे ओैषध उपयुक्त असल्याचा आमचा दावा नाही, असे जसारेविक यांनी म्हटलं आहे.  

कोरोनावर उपचार करण्यासाठी सध्या पन्नास देशांमध्ये रेमडेसिविरचा वापर केला जातो. देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचाही आकडा वाढत आहे. यात कहर म्हणजे देशात रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता आहे.

यामुळे या इंजेक्शनचा काळा बाजारही जोरात सुरू आहे. कर्नाटकातून असेच एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे. म्हैसूरमध्ये एक टोळी रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली कुपीमध्ये खारट पाणी आणि प्रतिजैविक औषध टाकून विक्री सुरू होती. याप्रकरणी एका परिचारिकाला अटक करण्यात आली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख