खरा सचिन वाझे कोण... मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? भातखळकरांचा सवाल.. - Who is the real Sachin Waze sixth floor of the ministry silver Oak Atul Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

खरा सचिन वाझे कोण... मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? भातखळकरांचा सवाल..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर आत भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

''खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच..'' अशी टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.  भाजप महाराष्ट्र या टि्वटर हॅडलवरून भातखळकरांनी व्हिडिओ व्हायरल करुन आघाडी सरकारवार निशाणा साधला आहे.

''सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला, हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून निवासस्थानासह १० ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी. ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे..'' असे टि्वट भातखळकरांनी केले आहे. 

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विषयावर टि्वट करत विरोधक भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सीबीआयच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. याबाबत जयंत पाटील यांनी टि्वट केले आहे. देशमुख यांच्या घरावरील सीबीआय कारवाईचा जयंत पाटलांनी निषेध केला आहे. 

''केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल. अनिल देशमुख या प्रकरणातून लवकरच निर्दोष बाहेर पडतील,'' असे  राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

हेही वाचा : अनिल देशमुखांनी आता आमदारकीचा राजीनामा द्यावा....
भंडारा :  केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता परत अनिल देशमुखांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या आमदारकीचा ही राजीनामा देण्याची मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे. भाजप नेहमी वाजे प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत असताना राष्ट्रवादी व कॅाग्रेसचे लोक अनिल देशमुख दोषी नसल्याच्या कांगावा करत होते, मात्र आता सीबीआय CBIचौकशीत सर्व समोर येणार असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे. हिच वेळ आहे मुख्यमंत्र्यांनी ही राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली आहे.  

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख