मुंबई : 'भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसे ते आता एका अजान प्रकरणात फसफसताना दिसत आहे. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज भाजपवर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा,' असं मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी पांडुरंग सकपाळ यांनी दिली होती. त्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. शिवसेना आता सेक्युलर झाली आहे, असं शिवसेनेनं जाहीर करून टाकावं, असं आव्हानच भाजपनं दिलं होतं. त्यालाच शिवसेनेचे चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, असे टीकास्त्र शिवसेनेने भाजपवर सोडलं आहे.
शिवसेनेने भगवा सोडला, हिंदुत्वाला मूठमाती दिली. शिवसेना मतांसाठी लांगूलचालन करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू आहे’. ‘अजान’प्रकरणी शिवसेनेवर अशी चिखलफेक करणे म्हणजे दिल्लीतील सीमेवरील शीख शेतकऱयांना पाकिस्तानी अतिरेकी म्हणण्यासारखेच आहे, असे शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे.
नारायण राणे मुख्यमंत्री व्हावेत, हे नीतेश राणेंना मान्य नाही का?: वैभव नाईक #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #NiteshRane #NotAgree #NarayanRane #ChiefMinister #VaibhavNaik @VaibhavNaikMLA @ShivsenaComms https://t.co/dJwoP2g4rj
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 1, 2020
काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात
- भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला. त्यांनी यावर असा अपप्रचार सुरू केला की, ‘पहा, काय सुरू आहे.
- शिवसेनेने भगवा सोडला, हिंदुत्वाला मूठमाती दिली. शिवसेना मतांसाठी लांगूलचालन करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू आहे’.
- ‘अजान’प्रकरणी शिवसेनेवर अशी चिखलफेक करणे म्हणजे दिल्लीतील सीमेवरील शीख शेतकऱयांना पाकिस्तानी अतिरेकी म्हणण्यासारखेच आहे.
- दिल्लीच्या सीमेवर जे शीख शेतकरी बांधव आंदोलनात जमले आहेत त्यातील बहुसंख्य हे पूर्वाश्रमीचे ‘जवान’ आहेत व देशासाठी त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
- अनेकांची मुले आजही सीमेवर पाकडय़ांशी लढत आहेत व त्यातील चारजण गेल्या दोनेक दिवसांत शहीद झाल्याचे वृत्त आहे.

