पवारांना रेमडेसिविर इंजेक्शन कुठून मिळाले ?..निलेश राणेंचा सवाल - Where did MLA Rohit Pawar get Remedacivir injection Nilesh Rane  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पवारांना रेमडेसिविर इंजेक्शन कुठून मिळाले ?..निलेश राणेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

भाजपचे नेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर  रेमडेसिविर इंजेक्शनवरून टीका केली आहे.

कर्जत : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे.  ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आमदार.रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे.

भाजपचे नेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर रेमडेसिविर इंजेक्शनवरून टीका केली आहे. याबाबत राणे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात की, सामान्य जनतेला रेमडेसिविर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही मात्र रोहीत पवारांना वाटप करण्या इतपत रेमडीसीवर इंजेक्शन कुठून मिळाले? रेमडीसीवर तुम्हाला कुठून व कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध झाले याचा रोहीत पवारांनी खुलासा करावा नाही तर तात्काळ सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी.

काल आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील गायकरवाडी येथे भेट देत प्रगतीपथावर असलेल्या 350 बेडच्या कोव्हिडं सेंटरची पाहणी केली.  नगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता तेथील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हा रुग्णालयास 5000 एन-95 मास्क, तर कर्जत-जामखेडसाठी 5000 एन-95 मास्क पाठवण्यात आले आहेत. तसेच कोरोना रुग्णांसाठी लागणारे पन्नास ऑक्सिजन सिलिंडर कर्जत जामखेड मतदारसंघासाठी दिलेले असून, त्यात कर्जत व जामखेड साठी प्रत्येकीसाठी 25 आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत.

कर्जत तालुक्यातील रुग्णांचा झपाट्याने वाढत असलेला आकडा कमी करण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून पुणे, मुंबई शहरांच्या धरतीवर रुग्णांसाठी 350 अद्ययावत बेडची व्यवस्था कर्जत जवळील गायकरवाडी येथे करण्यात येत असून, जामखेड येथेही 300 बेडचे कोरोना सेंटर व्यक्तिगत स्वरूपातून उभा करण्यात येत आहे.  

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताअभावी कुणालाही आपला जीव गमावू लागू नये, यासाठी राज्यातील युवांनी पुढाकार घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून रक्तदान करावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावर केले आहे.  
Edited by: Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख