सुरेश माने, सुषमा अंधारे यांच्या राजकीय भवितव्याचे काय होणार?

राष्ट्रवादीकडे आमदारकी आणि इतर सत्तापदांसाठीमोठी रांग आहे. कोणाकोणाला संधी द्यायची, असा प्रश्न त्यांच्यापुढेही आहे.
what will political future of suresh mane and sushma andhare
what will political future of suresh mane and sushma andhare

पुणे: परिवर्तनवादी चळवळीतील ताकदीचे नेते असलेल्या सुरेश माने, सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले. हे करत असताना चळवळीच्या मूळ प्रवाहापासून त्यांना बाजूला व्हावे लागले. राजकीय प्रगतीसाठी त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले, मात्र राष्ट्रवादी सत्तेत जावूनही त्यांना  संधी मिळालेली नाही, पुढे ती मिळण्याची शक्यताही धुसर आहे.  

सुरेश माने हे बहुजन समाज पक्षातील एक महत्वाचे नाव होते. ते पक्षाचे महासचिव होते. पक्षाची भुमिका ताकदीने मांडून केडरबेस संघटना बांधणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. प्रभावी वक्ते, तसेच घटनेचे अभ्यासक असल्याने त्यांचा सर्वदूर प्रभाव होता. चार वर्षापुर्वी बसप नेतृत्वाबरोबर फारकत झाल्याने त्यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी नावाचा पक्ष काढला. नागपूर, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात पाय रोवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. नागपूर मतदारसंघात लोकसभेला ते उभे होते. मात्र दखलपात्र मतदान त्यांना मिळू शकले नाही. 

सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीवर प्रभावीपणे बोलणाऱ्या वक्त्या आणि भटके विमुक्त समुहातील कार्यकर्त्या. संविधानासंबंधी त्या करत असलेली मांडणी लोकांना भावायची. त्यामुळे लोकसभेपुर्वी त्यांनी वंचित आघाडीत काम करावे, असा आग्रह अनेकांनी केला होता. मात्र वंचितचे नेतृत्व सुषमा अंधारे यांची दखल घ्यायला तयार नव्हते. या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पेस होती. ती भरून काढण्यासाठी अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यांनी आक्रमकपणे राष्ट्रवादी- काँग्रेसचा प्रचार केला. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी आपल्या गणराज्य संघाचा पाठिंबा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिला होता, तसेच जोरदारपणे प्रचार केला होता. 

सुरेश माने यांनी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. सुरेश माने तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. बसपाला पर्यायी राजकारण करण्यासाठी त्यांनी काढलेला पक्ष त्यांनी त्या निवडणुकीसाठी गुंडाळून ठेवला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. फार कमी मतदान त्यांना मिळाले. सुरेश माने आणि सुषमा अंधारे हे राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांना राजकीय प्रगती साधायची असल्याने त्यांनी राष्ट्रवादीबरोबर जाणे पसंद केले. हे घडत असताना माने, अंधारे यांच्यावर विश्वास ठेवत असलेला वर्ग काही प्रमामात नाराज झाला. महत्वाची बाब म्हणजे आज राष्ट्रवादी सत्तेत असताना त्या सत्तेत माने, अंधारे यांचे आणि त्यांच्या समाजाचे स्थान काय आहे, असा प्रश्न त्यांनाच विचारला जात आहे.

वरळीच्या निकालापासून सुरेश माने शांत आहेत. त्यांचा पक्ष पुढे काम करणार की नाही, हे अजून अस्पष्टच आहे. पण सुषमा अंधारे थेटपणे राष्ट्रवादीबरोबर काम करत आहेत. आमदारकी देवून आपल्यासारख्या भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्तीला पक्ष संधी देईल, असा ठाम विश्वास त्यांना आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तिकीट मिळण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मात्र त्यांचा विचार झाला नाही. मात्र अंधारे यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या अमोल मिटकरी यांचा विचार झाला. त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद लावली. त्याबद्धतीने अंधारे यांच्यासाठी ताकद कोण लावणार? हाच मोठा प्रश्न आहे. आगामी काळात राज्यपालनियुक्त आमदारांच्या विधान परिषदेतील जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी संधीच्या प्रतिक्षेत अनेकजण आहेत. त्यात सुषमा अंधारे याही आहेत. त्यांच्याबाबत राष्ट्रवादीचे नेतृत्व काय निर्णय घेते, हे काही दिवसांतच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com