सीएम पीएम भेटीत झाले असेल तरी काय? - What was discussed during the meeting between Chief Minister Uddhav Thackeray and the Prime Minister | Politics Marathi News - Sarkarnama

सीएम पीएम भेटीत झाले असेल तरी काय?

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 9 जून 2021

मनातील कटुता संपवत मदत मागण्यासाठी ही भेट मागतानाच उध्दव ठाकरे यांनी दोन्ही सहकारी पक्षांना बरोबर नेत नवी राजकीय व्यवस्थाही कायम ठेवण्याचे संकेत दिले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी २० मिनिटे नेमकी काय चर्चा केली असेल याचे अंदाज लावण्यात राजकीय वर्तुळ मग्न झाले आहे. भेटीची विनंती करणारा दूरध्वनी स्वत: ठाकरे यांनी केल्याची माहिती असून पंतप्रधानांचे विश्वासू सहकारी संजय भावसार यांनी लगेच भेटीची वेळ कळवली. (What was discussed during the meeting between Chief Minister Uddhav Thackeray and the Prime Minister)

मनातील कटुता संपवत मदत मागण्यासाठी ही भेट मागतानाच उध्दव ठाकरे यांनी दोन्ही सहकारी पक्षांना बरोबर नेत नवी राजकीय व्यवस्थाही कायम ठेवण्याचे संकेत दिले. राजकीयदृष्टया हे कसब ठाकरेंनी सिध्द केले. मात्र, बंद दरवाजाआड पीएमसीएम काय चर्चा झाली हा सर्वाधिक औत्सुक्याचा विषय आहे. अनिल देशमुख परमबीरसिंग प्रकरणातून बाहेर आलेली माहिती केंद्रातर्फे देण्यात आली काय किंवा अनिल परबांसारख्या विश्वासू सहकार्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावू नका अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती काय हा प्रश्न चर्चेत आहे. 

हे ही वाचा : मंगलदास बांदलांची १४ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर येरवडा कारागृहात रवानगी

राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेच्या नेतृत्वातले सरकार योग्य ती कामगिरी करत नसल्याने दबाव निर्माण करणे सुरु केल्याचे बोलले जाते. पंतप्रधानांची भेट घेणे हे त्यावरचे उत्तर आहे काय? सत्तेत एकत्र नसलो तरी मनाने एक आहोत हे विधानही त्याच दृष्टीकोनातून पाहिले जाते आहे. प्रारंभी पंतप्रधानांना तिन्ही नेते मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यासह भेटले. दहा मिनिटांनी ते बाहेर आले अन काही वेळाने अजितदादा पवार आणि अशोक चव्हाणही. त्यानंतर भोजन तसेच प्रवासादरम्यान दोघांच्या भेटीतील चर्चेचा ओझरता उल्लेखही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला नाही असे समजते.

भाजपनेतेही या भेटीचे अर्थ लावत असून हा बाळासाहेबांच्या पुत्राशी झालेला संवाद होता की आक्रमक झालेल्या जुन्या सहकार्याशी झालेली बातचीत होती यावरच सारे अवलंबून आहे. मोदीजी आजकाल राजकारणाकडे फार लक्ष देत नाहीत पण भेटीसाठी वेळ देणेही प्रतिकात्मक मानले जाते आहे. या भेटीत मराठा आरक्षण, राज्यातले एक लाखापेक्षा जास्त मृत्यू अशा जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली असेल काय असा प्रश्नही केला जातो आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत विसंवाद निर्माण झाला असेलच तर या भेटीने पर्याय उपलब्ध आहे, असे सांगितले गेले काय अन मोदी शहा सेनेला माफ करतील काय हे प्रश्नही महत्वाचे ठरले आहेत. 

हे ही वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाजले: महापौरांविरोधात नगरसेवकांची विश्वजित कदमांकडे तक्रार 

दरम्यान, या दोघांदरम्यानची चर्चा व्यक्तीगत स्वरुपाची होती, राजकीय नव्हती असे कॉंग्रेसनेते मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर आमचे अध्यक्ष शरद पवारही पंतप्रधान मोदींना भेटतात त्यामुळे भेट घेतली तर त्याचे राजकीय अर्थ अनावश्यक असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख