पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काय सांगितलं?

भावनेच्या भरात बोलल्याचे पडळकर बोलले आहेत. त्यामुळे हा विषय संपला आहे असे पाटील म्हणाले. पण हा वाद अजून संपलेला नाही. टीकाटिप्पण्णी सुरूच आहे.
what say gopichand padalkar in conversation with devendra fadavnis
what say gopichand padalkar in conversation with devendra fadavnis

पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका करून चर्चेत आलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे याप्रकरणात माफी मागायला तयार नाहीत. त्यांनी यासंदर्भाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्टीकरण दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे पडळकरांनी फडणवीसांना आणि फडणवीसांनी पडळकरांना नक्की काय सांगितले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सहा दिवसांपुर्वी पडळकर यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे विधान केले होते. त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठिकठिकाणी आंदोलने केली. पडळकर ज्या दिवशी पंढरपूरात बोलले त्यादिवशी फडणवीसांचा सोलापूर दौरा होता. त्यावेळी फडणवीसांना पडळकरांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारले होते. त्यावेळी फडणवीसांनी पडळकरांचे थेट समर्थन केले नाही, पण भावना कठोर असल्यातरी शब्द जपून वापरायला पाहिजेत, असा सल्ला दिला. यासंबंधाने पडळकर खुलासा करतील, असेही सांगितले होते. मात्र पडळकरांनी अद्यापपर्यत कोणताही खुलासा केलेला नाही.

या वादाच्या दुसऱ्या दिवशी पडळकर हे खानापूर, आटपाडी तालुक्यात होते. तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगली जिल्ह्यात चारचाकींची रॅली काढली आणि सर्वत्र सत्कार स्वीकारले. जत भाजपने त्यांचा माजी आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते सत्कार केला. यादरम्यान पडळकर हे पत्रकारांशी बोलले, मात्र ते बोलताना वादाच्या विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगून टाकले होते.  

भाजप वरिष्ठ पातळीवरून वाद शमवेल असे वाटत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांचे अप्रत्यक्ष समर्थन केले. पडळकर हे भावनेच्या भरात बोलून गेले आहेत, पण त्यांच्या मनात पवारांबद्दल आदर आहे, असे पाटील म्हणाले. त्याला जोडून 'मला व देवेंद्र फडणवीसांना टोपण नाव पाडले आहे. हे कसे चालते?' हा प्रश्न केला. चंद्रकांत पाटलांनी पुन्हा पत्रकारांना सांगितले की, पडळकरांनी फडणवीसांकडे स्पष्टीकरण दिले आहे. भावनेच्या भरात बोलल्याचे पडळकर बोलले आहेत. त्यामुळे हा विषय संपला आहे असे पाटील म्हणाले. पण हा वाद अजून संपलेला नाही. टीकाटिप्पण्णी सुरूच आहे.

या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पडळकरांनी कोणताही खुलासा केलेला नाही. शिवाय चंद्रकांत पाटील म्हणतात त्याप्रमाणे फडणवीसांनी तसे काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे भाजपच्या एकूण भुमिकेविषयी साशंकता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पडळकरांनी फडणवीसांना आणि फडणवीसांनी पडळकरांना काय सांगितले, हे अजून गुलदस्त्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com