नागपूर पोलिस दलाला झाले तरी काय?

पीएसआयने तिला घटस्फोटित असल्याचे सांगून दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवले.
4police_135.jpg
4police_135.jpg

नागपूर : रक्षण करतेच भक्षण करणारे निघाले तर दाद कुणाकडे मागायची, अशी परिस्थिती नागपूर पोलिस दलाची Nagpur police force झाली आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने केलेल्या कृत्यामुळे सध्या नागपूर पोलिस दल चर्चेत आहे. विधवा महिलेला सहकार्य करण्याचे आमिष दाखवून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. What happened to Nagpur police force

पतीचे निधन झाल्यानंतर उद्भवलेल्या कौटुंबिक वादाची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविण्यासाठी आलेल्या विधवा महिलेला सहकार्य करण्याचे आमिष दाखवून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजबहाद्दूरसिंह दीनदयाल चौहान असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला प्रिया (काल्पनिक नाव) ही गिट्टीखदान परिसरात राहते. तिला दोन मुली आहेत. तिच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले. पतीच्या निधनानंतर सासरी राहताना तिला कौटुंबिक त्रास व्हायचा. नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांत तक्रार करण्याचे ठरवले. त्यामुळे ती एकटीच गिट्टीखदान पोलिस ठाण्यात जायला निघाली. यादरम्यान तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राजबहाद्दूरसिंह चौहान याने तिला थांबवून विचारपूस केली आणि लिफ्ट दिली. त्याने तिला पोलिस ठाण्यात सोडून दिले आणि तिला मोबाईल नंबरची मागणी केली. तिने मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता सांगितला.

राजबहाद्दूरसिंह याने नागपूर पोलिस दलात अधिकारी असल्याचे सांगून सासुरवाडीतील त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे एकाकी असलेल्या महिलेला पोलिस अधिकारी मदत करीत असल्याने तिची चिंता मिटली. दुसऱ्याच दिवशी राजबहाद्दूरसिंह महिलेच्या घरी गेला. वर्दीवर आल्याने त्याने महिलेच्या कुटुंबीयांना पुन्हा त्रास न देण्याबाबत दम भरला. पोलिसाच्या धमकीमुळे कुटुंबीय घाबरले. त्यांनी तिला कोणताही त्रास ने देता संपत्तीतील तिचा वाटा दिला.
 
एकाकीपणाचा फायदा घेत ओढले जाळ्यात
पीएसआय राजबहाद्दूर सिंह वारंवार महिलेच्या घरी यायला लागला. येताना दोन्ही मुलींसाठी खाऊ, फळे आणि काही किराणा सामानही आणायचा. हळूहळू त्याने महिलेच्या एकाकीपणाचा फायदा घेत तिच्याशी सलगी केली. तिलाही पतीच्या निधनानंतर आणि सासरच्या कुटुंबीयांच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्याची मदत होत होती. पीएसआयने तिला घटस्फोटित असल्याचे सांगून दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवले.

सेवानिवृत्त होताच अचानक झाला गायब
राजबहाद्दूर सिंह याने प्रियाशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या घरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागला. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. परंतु राजबहाद्दूर विवाहित असून, त्याला दोन मुलं असल्याचे तिला कळले. त्यामुळे तिने त्याच्यापासून दुरावा केला. मात्र, तो वर्दीचा धाक दाखवून तिच्या घरी बळजबरीने राहू लागला. तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. मुलींना मारहाण करायचा. पोलिस दलातून सेवानिवृत्त होताच त्याने तिच्या घरातून पळ काढला.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com