What food does Prime Minister Modi like! Learn from their cook Badri Meena | Sarkarnama

पंतप्रधान मोदींना कोणते जेवण आवडते ! जाणून घ्या त्यांचे कूक बद्री मीना यांच्याकडून

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना खिचडी खूप आवडते आणि आठवड्यात दोन तीन वेळा तरी त्यांच्या जेवणात खिचडी ही असतेच. शिवाय इडली सांभार, ढोकला आणि डोसाही त्यांच्या जेवणात असतेच. 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाईफ स्टाईल कशी आहे. त्यांना कोणते जेवण आवडते ! ते शाकाहारी की मांसाहारी ! आदी प्रश्‍न सामान्य माणसाला पडत असतील. राजकारण असो इतर कुठल्याही क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे वैयक्तिक जीवन आणि त्यांचे राहणीमान याविषयी नेहमीच उत्सुकता असते. 

मां नहीं, इस शख्स के हाथ का खाना खाते हैं नरेंद्र मोदी, सामने आई PM के घर  की रसोई के अंदर की बातें | narendra modi personal cook badri meena shares  prime

आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मोदींना कोणत्याप्रकारचे जेवण आवडते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपले पंतप्रधान मोदी हे पूर्णपणे शाकाहारी आहेत. भारतच नव्हे तर जगभरात ते कोठेही असोत त्यांना शाकाहारीच जेवण लागते. ते मांसाहार करीत नाही. मोदी यांचा जन्म 17 सप्टेबर 1950 आहे आणि आज ते 70 वर्षाचे झाले आहेत. रा. स्व.संघाचे स्वयंसेवक, गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आज मोदी हे भारतातील सर्वशक्तमान नेते आहेत.त्यांना शाकाहारी जेवण मनापासून आवडते आणि त्यांच्या काही खास आवडीनिवडीही आहेत. 

मोदी यांच्या कूकचे नाव बद्री मीना असे आहे. गेल्या वीस वर्षापासून ते मोदी यांच्यासाठी जेवण बनवितात. त्यांना काय हवे, काय नको इथपासून दररोज त्यांना कोणत्याप्रकारचे जेवण द्यायचे याचा निर्णय अर्थात मीना यांचाच असतो. खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आईने बनविलेले जेवण अधिक भावते. ते आईने बनविलेले जेवण आवडीने खातात. मात्र पुढे मोदी राजकारणात सक्रिय झाले. घर सुटले. गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्यासाठी मीणा हे कूक म्हणून वीस वर्षे आहेत. 

मां नहीं, इस शख्स के हाथ का खाना खाते हैं नरेंद्र मोदी, सामने आई PM के घर  की रसोई के अंदर की बातें | narendra modi personal cook badri meena shares  prime

मोदींच्या आवडीनिवडीविषयी बोलताना बद्री म्हणतात, की मोदीजींना अस्वच्छता अजिबात चालत नाही. माझ्या हाताखाली दहा ते बारा लोक काम करतात आणि मीच मुख्य शेफ आहे. कोणी कोणते काम करायचे हे बद्री ठरवितात आणि सर्वांना कामे वाटून देण्याचे कामही ते स्वत:च करतात. 

आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना खिचडी खूप आवडते आणि आठवड्यात दोन तीन वेळा तरी त्यांच्या जेवणात खिचडी ही असतेच. शिवाय इडली सांभार, ढोकला आणि डोसाही त्यांच्या जेवणात असतेच. 

हे तिन्ही आइटम मोदी यांना आवडतातच. याशिवाय मोदींना आपल्या गुजरातचे जेवण आवडते. मोदीजींना दररोज कोणते जेवण द्यायचे याचा निर्णय बद्री घेत असतात. तसेच किती वाजता जेवण द्यायचे त्यांच्या जेवणात कोणते पदार्थ असतील, किती पदार्थ असतील हे ही बद्री ठरवितात. 

बद्री मीना हे मोदींचे केवळ कूकच नाहीत तर ते त्यांचे चांगले मित्र आहेत. मोदींवर जीवापाड प्रेम करणारे बद्रीहे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी जगभरातील नेटकरी माहिती जाणून घेतात. मोदींच्या जेवणाच्या आवडीनिवडी म्हणूनच जगभरातील लोकांना कळल्या आहेत. तर असे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कूक.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख