UPच्या राजकारणात नक्की चाललंय काय ?  - What exactly is going on in UP politics Yogi Adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

UPच्या राजकारणात नक्की चाललंय काय ? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप पक्षातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर Yogi Adityanath केला आहे. मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्याची मागणी समोर आल्यानंतर उत्तरप्रदेशातील राजकीय घडामोडींकडे सगळ्याचे लक्ष आहे. पक्षातंर्गत तक्रारी, भाजप-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या बैठकी, आगामी विधानसभा निवडणूक यामुळे उत्तरप्रदेशातील राजकारणात नक्की काय सुरू आहे, याची चर्चा रंगली आहे. What exactly is going on in UP politics Yogi Adityanath

तीन आठवठ्यापासून दिल्ली येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहे. पंचायत समिती निवडणुकीत भाजपला आलेले अपयश आणि कोरोना रोखण्यास अपयशी ठरलेले योगी सरकार यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तर भाजपमधील काही नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात सुरवात केली आहे. 

भाजपचे नेते बी.एल. संतोष आणि प्रभारी राधा मोहन सिंह यांनी काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मैार्य आणि दिनेश शर्मा यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत बारा मंत्र्यांसोबत त्यांनी 'वन टू वन' बंद खोलीत चर्चा करुन उत्तर प्रदेश भाजपचा आढावा घेतला. अशा परिस्थितीत निवडणुका झाल्या तर उत्तरप्रदेशातील भाजपला किती यश मिळेल..,योगी सरकारवर भाजप आमदार नाराज का आहे, आदी प्रश्नांवर या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. 

गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ यांना वगळून दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर ३१ मे रोजी रात्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळाले होते. पण आज भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अन् मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पुढील निवडणूक ही योगींच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचे नड्डा यांनी सांगितले. त्यामुळे "योगी आदित्यनाथ हटाव" ही मोहिम राबविणाऱ्या भाजपमधील नेत्यांना अपयश आले आहे.   

मंत्रीमंडळाची विस्ताराच जबाबदारी योगी आदित्यनाथांवर  

राधा मोहन सिंह यांनी सांगितले की, पक्षातील काही जण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विनाकारण तक्रारी करीत आहेत. योगी आदित्यनाथ सरकारचे काम चांगले आहे. मंत्रीमंडळात जी पदे खाली आहेत. ती लवकरच भरण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला समाधानकारण यश मिळाले आहे. 

प्रदेशाध्यक्षांकडून योगी आदित्यनाथांचे कैातुक..
उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले की योगींसारखा चांगला मुख्यमंत्री नाही, त्यांच्याइतके कोणीही काम केलेले नाही. यापूर्वीच्या सरकारने भष्ट्राचार करुन जनतेचा पैसा लुटला होता. पण योगी सरकारने राज्यात कायद्याचे राज्य आणले. मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान दिलं आहे.  २० हजार पदांवर विविध कार्यक्रर्त्यांची नेमणूक केली आहे. लवकरच रिक्त पदावर नेमणुका करण्यात येणार आहे. आगामी वर्षांच्या पहिल्या महिन्यात होणारी निवडणुकीचे नेतृत्व योगी आदित्यनाथ करणार आहेत.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख