E-RUPI : स्मार्टफोन, इंटरनेटशिवाय एसएमएसने पैसे ट्रान्सफर करा!

कुठल्याही स्मार्टफोनविना, इंटरनेटशिवाय, कुठलंही अॅप डाऊनलोड न करता एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत.
E-RUPI : स्मार्टफोन, इंटरनेटशिवाय एसएमएसने पैसे ट्रान्सफर करा!
Sarkarnama Banner - 2021-08-02T141602.990.jpg

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून आज एक नवी सुविधा e-RUPI Digital Payment नागरिकांना दिली जाणार आहे.  'ई-रुपी'चं E-RUPI वाऊचरच्या सहाय्याने ट्रान्झॅक्शनसाठी कार्ड, ऑनलाईन बँकिंग किंवा इतर डिजिटल पेमेंट अॅपची गरज भासणार नाही. याद्वारे थेट ट्रान्झॅक्शन म्हणजेच देवाण-घेवाण पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडरला पेमेंट मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या 'ई-रुपी'चं उद्घाटन करण्यात येत आहे. 

'ई-रुपी' डिजिटल पेमेंट हे प्लॅटफॉर्म कॅशलेस आणि संपर्क रहीत माध्यम आहे. हे प्रीपेड गिफ्ट व्हाऊचर सारखे असू शकते, ज्याद्वारे तुम्ही ठराविक ठिकाणी त्याचा वापर करु शकता 'ई-रुपी' E-RUPI मुळे कुठल्याही स्मार्टफोनविना, इंटरनेटशिवाय, कुठलंही अॅप डाऊनलोड न करता एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. 

''शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळची यादी तशी लांब'' राणेंचा राऊतांवर 'प्रहार'
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ने ही सुविधा तयार केली आहे. . याद्वारे थेट लाभार्थीच्या मोबाईलवर ई-वाऊचर पाठवलं जाईल. क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगवर आधारीत ई-वाऊचरद्वारे लाभार्थींपर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे पोहचवण्यात येतील.

सोळा कोटींच्या इंजेक्शनानंतरही अकरा महिन्याच्या वेदिकाची मृत्यूशी झूंज अपयशी 
हे प्रीपेड गिफ्ट व्हाऊचर सारखे असू शकते, ज्याद्वारे तुम्ही ठराविक ठिकाणी त्याचा वापर करु शकता. एसएमएसवर पैसे ट्रान्सफर करता यावे यासाठी ही सुविधा लॉन्च करण्यात आली आहे. हा एक प्रकारे ऑनलाईन चेक असेल, जो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकेल. ज्याला तो चेक वटवायचा आहे, तो मोबाईल क्रमांक आणि ओटीपी द्वारे ते पैसे आपल्या खात्यात घेऊ शकतो. या व्यवहारात बँक, पैसे पाठवणारा व्यक्ती, आणि पैसे स्वीकारणारा व्यक्ती या तीन जणांना समावेश असेल. याशिवाय, मोबाईल कंपन्यांनाही यासाठी डिजीटल सुरक्षा पुरवावी लागणार आहे. 
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in