बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात फरक काय : पवारांनी दिले हे उत्तर

एक शरद, सगळे गारद या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात शरद पवार यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.
sharad pawar-uddhav
sharad pawar-uddhav

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात फरक काय, असा प्रश्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. उद्धव हे मुख्यमंत्री आहेत. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात त्यांची निर्णयप्रक्रिया पाहिली. ते अधिक सावधगिरीने निर्णय घेतात. बाळासाहेब ठाकरे हे तडकाफडकी निर्णय घ्यायचे, असे स्वभाववैशिष्ट्य पवार यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे मत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात बाळासाहेबांच्या एका गुणाचा मला उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब घराबाहेर पडायचे नाहीत. पण बाहेरच्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचे लक्ष असायचे. तसेच मला कोरोनाच्या काळात करावे लागले.

लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते यासंदर्भात विचारले असता त्याचा पवार यांनी इन्कार केला. लॉकडाउनमुळे अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्या आहेत आणि या अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्याचा परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झाले. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवे असते ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही.  पण त्यात सत्य नाही, असे पवारांनी स्पष्ट केलं आहे.  


राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपाला साथ दिली नसती तर भाजपाला राज्यात केवळ ४० ते ५० जागा मिळवता आल्या असत्या असेही मत त्यांनी व्यक्त केले. भाजपला राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये १०५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं योगदान असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

लोकशाहीमध्ये १०५ जागा असणारा प्रमुख पक्ष राज्यात सरकार स्थापन करु शकला नाही. यासंदर्भात तुमचं काय मत आहे,” असा प्रश्न राऊत यांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी भाजपाने १०५ पर्यंत कशी मजल मारली हे पाहणे महत्वाचे सांगितेल. भाजपचा १०५ हा जो आकडा आहे त्यामध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यामध्ये शिवसेना सहभागी नसती. किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केलं तर तो १०५ जागांचा आकडा ४०-५० च्या आसपास असता. भाजपाचे काही नेते जे १०५ १०५ असं सांगत आम्ही १०५ असतात. मात्र त्यांना १०५ वर पोहचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं नाही वेगळं काही करण्याची गरज होती,” असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com