महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेले गिरीशभाऊ, तुम्ही बंगालामध्ये हे काय करत आहात? - what are you doing Girish Mahajan in West Bengal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेले गिरीशभाऊ, तुम्ही बंगालामध्ये हे काय करत आहात?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

महाजन हे पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त 

पुणे : माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठीच्या कामात गुंग आहेत. त्यांच्याकडे बालूरघाट मतदारसंघाची  जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन असो की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रोड शोचे आयोजन असो यात ते आघाडीवर आहे. मात्र अमित शहा यांच्या रोड शो दरम्यानच्या एका फोटोमुळे ते विरोधकांकडून ट्रोल होत आहेत. 

 

प्रसिद्ध अर्थतज्ञ अशोककुमार लाहिरी हे येथून भाजपचे उमेदवार आहेत. त्यासाठी कोपरा सभा घेणे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे आदी जबाबदाऱ्या ते पार पाडत आहे. या परिसरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाटी गंगारामपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभास्थळाचे नियोजन करण्यातही महाजन अग्रभागी होते. 

लाहिरी यांच्यासाठी अमित शहा यांचा रोड शो हा 19 एप्रिल रोजी झाला. तेव्हाचे काही फोटो गिरीश महाजन यांनी सोशल मिडियात शेअर केले. महाजन हे शहांसोबत वाहनावर दिसतात. मात्र या वाहनाला रस्त्यातून `साईड` सांगताना महाजन स्वतः खाली उतरले आहेत आणि चालकाला इशारा करत असल्याचा हा फोटो आहे. महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांवर काय वेळ आली, असा सवाल नेटकरी त्यामुळे विचारत आहेत. तर पक्ष मोठा, व्यक्ती नाही, असे म्हणत भाजप समर्थक त्याला उत्तर देत आहेत.

भाजपने महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये पाठवले आहेत. गिरीश महाजन यांच्यासह विनोद तावडे आणि काही आमदारही तेथे प्रचारासाठी गेले होते. पण महाजन हे मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे त्यांच्या ट्विटवरील फोटोंवरून दिसून येते. तावडे यांनी आपले ट्विटर अकौंट हे सध्या काही काळापुरते बंद ठेवल्याने त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन काय केले, हे कळू शकले नाही.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख