अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा...'दीदी ओ दीदी'ला जनतेचं सडेतोड उत्तर  - West Bengal Election Results 2021 Live Akhilesh Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा...'दीदी ओ दीदी'ला जनतेचं सडेतोड उत्तर 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

 अखिलेश यादव यांनी दीदी जिओ दीदी हॅशटॅग केला आहे.

लखनौ : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा  माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली आहे. तृणमूल तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा तयारीत आहेत. ममता बॅनर्जी या २०२ जागांवर आघाडीवर आहे. 

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना आनंद झाला आहे. त्यांनी टि्वट करीत ममतादीदींचं अभिनंदन केले आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये अखिलेश यादव म्हणतात की, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या 'दीदी ओ दीदी' या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे.  अखिलेश यादव यांनी दीदी जिओ दीदी हॅशटॅग केला आहे. अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांना पुष्पगुच्छ देतानाचा फोटो टि्वट केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी बंगालमध्ये प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. गृहमंत्री अमित शाह यांनी २०० जागांवर विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला होता. पण सध्याच्या आकडेवारीवरुन भाजपचा शंभरचा आकडा गाठणार का बाबत शंका आहे. बंगालमध्ये एकूण २९४ जागा आहेत. बहुमतासाठी १४७ जागा आवश्यक आहे. आता तृणमूल कॅाग्रेसने २०० जागांवर आघाडीवर आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख