भाजपमध्ये गेलेले TMC नेता दीपेंदू बिस्वास पुन्हा स्वगृही परतणार.. - west bengal dipendu biswas will join tmc said join bjp was a bad decision | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमध्ये गेलेले TMC नेता दीपेंदू बिस्वास पुन्हा स्वगृही परतणार..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जून 2021

भावनेच्या भरात आपण भाजपमध्ये जाण्याच्या चुकीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी ममता दीदींना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतरही पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरुच आहे. निवडणुकीपूर्वी तुणमूल कॅाग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा तुणमूलमध्ये येण्यास इच्छुक आहेत. west bengal dipendu biswas will join tmc said join bjp was a bad decision

तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले दीपेंदू बिश्वास हे स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिलं आहे.  भावनेच्या भरात आपण भाजपमध्ये जाण्याच्या चुकीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी ममता दीदींना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी बशीरहाट दक्षिण परिसरातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

निवडणुकीपूर्वी सोनाली गुहा, दीपेंदू बिस्वास, रविंद्रनाथ भट्टाचार्य, जटू लाहिडी, शीतल सरकार, सरला मुर्मू आदींनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण निवडणुकीनंतर सोनाली गुहा आणि सरला मुर्मू आणि दीपेंदू बिश्वास यांचा भाजपमध्ये जाऊन अपेक्षाभंग झाला. 

दीपेंदू यांच्या अगोदर सोनाली गुहा यांनी ममता दीदींची माफी मागून पुन्हा स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोनाली यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  "ज्याप्रमाणे पाण्याबाहेर मासा राहू शकत नाही, त्याप्रमाणे मी आपल्याशिवाय राहू शकत नाही, " असे सोनाली यांनी ममता दीदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. मालदा जिल्हा परिषद सदस्य सरला मूर्मू आणि उत्तर दिनाजपूरचे आमदार अमोल आचार्य यांनीही तूणमूलमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

हेही वाचा :  मोदींनी बदली केलेले अल्पन बंदोपाध्याय ममतांच्या टीममध्ये.. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय हे काल ( ता. ३१ मे ) सेवेतून निवृत्त झाले आहेत. बंडोपाध्याय यांनी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमधील साठमारीत अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते राजीनाम्यानंतर ममतांच्या टीममध्ये सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना ३ वर्षांसाठी त्यांना आपले मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ममतांनी यातून केंद्राच्या दबावाला झुकणार नसल्याचा संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बंडोपाध्याय यांच्याविरोधात केंद्राच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊ शकते.  एच. के. द्विवेदी यांची पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ममता बॅनर्जींनी स्वतः ही माहिती दिली. 
Edited by : Mangesh Mahale    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख