मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावणं मुख्य सचिवांना महागात पडले..पदावरुन हटविले.. - west bengal chief secretary transferred central government directed him to report in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावणं मुख्य सचिवांना महागात पडले..पदावरुन हटविले..

वृत्तसंस्था
शनिवार, 29 मे 2021

बंदोपाध्याय यांना नार्थ ब्लॅाक कर्मचारी प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

कोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तीस मिनिटे वाट पाहायला लावणं हे पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना चांगलेच महागात पडले. यामुळे त्यांना पदावरुन हटविण्यात आले आहे.  त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. west bengal chief secretary transferred central government directed him to report in delhi

केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय यांची बदली केली आहे. बंदोपाध्याय यांना केंद्र सरकारकडे अहवाल देण्यास सांगितले आहे. यास वादळाने झालेल्या चक्रिवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र  मोदी (PM Narendra Modi) यांना तेथील मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांनी  अर्धा  तास  वाट  पाहायला  लावली. 

पंतप्रधान यायच्या आधी मुख्यमंत्री उपस्थित असणे राजशिष्टाचारनुसार आवश्यक असताना त्याविरोधी कृती ममता यांनी केली. मुख्य सचिव बंदोपाध्याय हेही ममतादीदी समवेत उशिरा बैठकीस पोहचले. त्यामुळे भाजने नेत्यांनी ममता दीदी व बंदोपाध्याय त्यांच्यावर टीका केली आहे. बंदोपाध्याय यांना ३१ मे रोजी नार्थ ब्लॅाक कर्मचारी प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारने त्यांना बदलीचे पत्र दिले आहे. मंत्रालय समितने  १९८७ च्या नियमानुसार ही बदली केली आहे. बंगाल सरकारने त्यांना सेवेतून मुक्त करावे, असे पत्रात म्हटलं आहे. काल मोदी आणि ममता दीदी यांची फक्त पंधरा मिनिटे चर्चा झाली. 

 तृणमूल कॅाग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंद्रु शेखर रॅाय म्हणाले की भारताच्या इतिहास हे प्रथमच होत आहे की एका राज्याच्या मुख्य सचिवाला बळजबरी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. मोदी सरकार इतक्या खालच्या पातळीवर येतील, असे वाटलं नव्हतं. बंगालच्या जनतेने निवडणुकीत भाजपला धडा शिकवून ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री केलं, म्हणून भाजप अशा पद्धतीनं वागत आहे. 

मोदी जेव्हा बंगालला पोहचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारकडून कोणीही उपस्थित नव्हते. ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव हे त्याच परिसरात होते. मात्र त्यांनी मोदींचे स्वागत केलं नाही.  नुकसानीचे निवेदन पंतप्रधानांच्या हातात दिले आणि त्या लगेच निघाल्या. तेथील मुख्य सचिव त्या बैठकीत सादरीकरण करणार होते. मात्र त्यांनाही हाताला ओढून घेऊन त्या घेऊन गेल्या. या साऱ्या घटनांवरून मोठा राजकीय धुरळा उडाला आहे.

यावरून संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath singh) यांनी ट्विट  करत  ममतांवर टीका केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेवरून ममता यांच्यावर टीका केली. तेथील राज्यपाल जगदिप धनकर यांनी हा काळा दिवस असल्याचे म्हटले. या प्रसंगानंतर केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. तेथील मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय यांना दिल्लीतील सेवेत बोलावून घेण्यात आले आहे. ते तेथे मुख्य सचिव म्हणून काम पाहू शकणार नाहीत, अशी व्यवस्था केंद्राने केली आहे. त्यासाठीचे आदेश आज रात्री उशिरा जारी केले. 

पश्चिम बंगालमध्ये वादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करण्यासाठी  आले, तेव्हा हा प्रकार घडला. खरे तर ममता या पंतप्रधानांना भेटणार की नाही, याचीच उत्सुकता होती. कारण मोदी यांच्यासोबतच्या बैठकीला तेथील विरोधी पक्षनेते आणि ममता यांचे राजकीय विरोधक सुवेंदु अधिकारी यांनाही निमंत्रण होते. त्यावरून ममता चिडल्या होत्या.  

Edited by : Mangesh Mahale   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख