केंद्र सरकारचा आदेश धुडकावला; मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला

केंद्र सरकारविरूध्द ममता बॅनर्जी हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
West Bengal Chief Secretary Alapan Bandyopadhyay meeting with CM Mamta Banerjee
West Bengal Chief Secretary Alapan Bandyopadhyay meeting with CM Mamta Banerjee

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल चे मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय यांना सोमवारी ( ता. ३१ मे ) दिल्लीतील केंद्रीय कार्मिक और प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) येथे सकाळी १० वाजता हजर राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. पण हे आदेश धुडकावत बंदोपाध्याय दिल्लीला गेले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानभवनातील बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळं केंद्र सरकारविरूध्द ममता बॅनर्जी हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (West Bengal Chief Secretary Alapan Bandyopadhyay meeting with CM Mamta Banerjee)

यास वादळाने झालेल्या चक्रिवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र  मोदी (PM Narendra Modi) यांना तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांनी  अर्धा  तास  वाट पाहायला  लावली. अल्पन बंदोपाध्यायही या बैठकीला वेळेत हजर झाले नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांनी ममतादीदी व बंदोपाध्याय त्यांच्यावर टीका केली. लगेचच केंद्र सरकारने बंदोपाध्याय यांची केंद्रात बदली करत ३१ मे रोजी नार्थ ब्लॅाक कर्मचारी प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. बंगाल सरकारने त्यांना सेवेतून मुक्त करावे, असे बदलीच्या पत्रात म्हटलं होतं.

बंदोपाध्याय यांच्या बदलीनंतर ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात त्यांची बदली करणे योग्य नाही. हे बेकायदेशीर असून केंद्रानं त्यांना त्यांचा पदाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. अधिकाऱ्यांच्या नैतिक मुल्यांचे हनन करू नका. आपला आदेश मागे घ्यावा, अशी विनंती ममतांनी केली आहे. 

ममतांच्या या पत्रावर अद्याप केंद्र सरकारकडून कोणातही प्रतिसाद आलेला नाही. पण बंदोपाध्याय यांना मुक्त करणार नसल्याचे ममतांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आज सकाळी बंदोपाध्याय दिल्लीत हजर होणार का, याबाबत उत्सुकता होती. पण त्यांनी दिल्लीत न जाता विधानसभेत ममतांसोबतच्या बैठकीला हजेली लावली आहे. या बैठकीत कोरोना व वादळाच्या स्थितीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, बंदोपाध्याय यांची बदली केंद्र सरकारकडून रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. 

बंदोपाध्याय यांच्या बदलीनंतर तृणमूल काँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तृणमूल कॅाग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंद्रु शेखर रॅाय म्हणाले की, भारताच्या इतिहास हे प्रथमच होत आहे की एका राज्याच्या मुख्य सचिवाला बळजबरी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. मोदी सरकार इतक्या खालच्या पातळीवर येतील, असे वाटलं नव्हतं. बंगालच्या जनतेने निवडणुकीत भाजपला धडा शिकवून ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री केलं, म्हणून भाजप अशा पद्धतीनं वागत आहे. 

यावरून संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath singh) यांनी ट्विट  करत  ममतांवर टीका केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेवरून ममता यांच्यावर टीका केली. तेथील राज्यपाल जगदिप धनकर यांनी हा काळा दिवस असल्याचे म्हटले. या प्रसंगानंतर केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. तेथील मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय यांना दिल्लीतील सेवेत बोलावून घेण्यात आले आहे. ते तेथे मुख्य सचिव म्हणून काम पाहू शकणार नाहीत, अशी व्यवस्था केंद्राने केली आहे. त्यासाठीचे आदेश आज रात्री उशिरा जारी केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com