भाजपच्या 24 आमदारांची राज्यपालांसोबतच्या बैठकीला दांडी; घरवापसीची शक्यता

चोवीस आमदार भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.
West Bengal 24 BJP MLAs stays away from Suvendu Adhikaris meeting
West Bengal 24 BJP MLAs stays away from Suvendu Adhikaris meeting

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला (BJP) लागलेली गळती थांबण्याची चिन्हं नाहीत. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर अनेक नेते आणि पदाधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये परतू लागले आहेत. आता आणखी 24 आमदार भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. या आमदारांनी सोमवारी राज्यपालांसोबत झालेली बैठकीला दांडी मारल्याने या चर्चेला ऊत आला आहे. (West Bengal 24 BJP MLAs stays away from Suvendu Adhikaris meeting)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा पराभव केलेले सुवेंदु अधिकारी यांना विरोधी पक्षनेता पद देण्यात आले आहे. तेही निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपमध्ये आले आहेत. निवडणूक निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. याअनुषंगाने सोमवारी सुवेंदू यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदारांनी राज्यपाल जगदीप धनखर यांची राजभवनात भेट घेतली. या बैठकीत बंगालमधील घटनांबाबत चर्चा करण्यात आली. 

भाजपचे 74 आमदार असून त्यापैकी 24 आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे या आमदारांची तृणमूलमध्ये घरवापसी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सुवेंदू अधिकारी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास या आमदारांची तयारी नसल्याच्या चर्चेलाही बळ मिळाले आहे. हे आमदार तृणमूलच्या संपर्कात असून मुकूल रॅाय यांच्याप्रमाणेच भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 

तृणमूलमध्ये परत घेण्यासाठी धरणे आंदोलन 

बीरभूम येथील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 50 पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता घरवापसीसाठी त्यांनी तृणमूलच्या कार्यालायसमोर चक्क धरणे धरले. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळून ते पुन्हा पक्षात आले आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या हातात फलक होते. आमची चूक झाली, आम्हाला पक्षात परत घ्या, असे या फलकांवर लिहिले होते. हे पदाधिकारी मागील काही दिवसांपासून तृणमूलमध्ये परत येण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी धरणे आंदोलनाचा मार्ग पत्करला. 

मुकुल रॅाय मुलासह तृणमूलमध्ये

नुकतेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय हे तृणमूलमध्ये परतले आहेत. मागील काही आठवड्यांपासून रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. रॉय यांनी ममतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. नंतर ममता आणि त्यांचे भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांचा पक्षप्रवेश झाला होता. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com