नीट,जेईई पुढे ढकलण्यासाठी सोनू सूद आग्रही, देशभरातील विद्यार्थ्यांना  पाठिंबा !  - Well, Sonu Sood insists to push JEE forward, support students across the country! | Politics Marathi News - Sarkarnama

नीट,जेईई पुढे ढकलण्यासाठी सोनू सूद आग्रही, देशभरातील विद्यार्थ्यांना  पाठिंबा ! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

आता मोदी सरकार कोणता निर्णय घेते हे पाहावे लागेल.

नवी दिल्ली : कॉंग्रेस, शिवसेना, तृणमूल कॉंग्रेसपाठोपाठ आता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही नीट आणि जेईई परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे  अभिनेता सोनू सूदनेही या परिक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत असे म्हटले आहे. 

कोरोनाच्या संकटाचा सामना संपूर्ण देशालाच करावा लागला. अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. आजपर्यंत शाळा, महाविद्यालये, मंदिरेही बंद आहेत. वाहतूक व्यवस्थाही ठप्प आहे. आता सप्टेबरमध्ये होणारी नीट आणि जेईई परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने या परिक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलल्या पाहिजेत अशी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मागणी केली आहे. 

आता मोदी सरकार कोणता निर्णय घेते हे पाहावे लागेल. परिक्षा पुढे ढकलतात की त्या सप्टेबरमध्ये होतात या निर्णयाकडे देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या दोन्ही परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आज मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती केली आहे. ओडिशातील पुरस्थिती आणि कोविड-19 संकट लक्षात घेता या परिक्षा पुढे ढकलणे कसे योग्य आहे याकडे पटनाईक यांनी त्यांचे लक्ष वेधले आहे. आता मोदी कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागेल. 

दरम्यान, भाजपचा लाडका अभिनेता सोनू सूद यानेही जेईई आणि नीट परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांने ही मागणी उचलून धरली आहे. काही दिवसापूर्वी सोनूने देशातील रोजगारांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेले एक व्यंगचित्र ट्विटवर आणि एफबीवर टाकल्याने भाजपच्या मंडळींनी त्याचा समाचार घेतला होता. या टीकेनंतर त्याने आपले ट्विट मागे घेतले होते. आजतर या दोन्ही परिक्षा रद्द व्हाव्यात यासाठी त्याने देशभरातील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख