नीट, जेईईवर सर्वमान्य तोडगा काढाः राहुल गांधी  - Well, come up with a consensus on JEE: Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

नीट, जेईईवर सर्वमान्य तोडगा काढाः राहुल गांधी 

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑगस्ट 2020

जेईई मेन आणि नीट या दोन्ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजन सरकारने आखले आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) आणि सामूहिक प्रवेश परीक्षा (जेईई) याबाबत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या चिंता लक्षात घेऊन त्यावर सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढावा असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सरकारला केले आहे. 

देशातील कोरोनाच्या विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अनेक विद्यार्थी संघटना आणि पालकांनी केली आहे. नीट आणि जेईईबाबत सरकारने विद्यार्थ्यांची मन की बात एेकावी आणि त्यावर सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढावा असे राहुल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

जेईई मेन आणि नीट या दोन्ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजन सरकारने आखले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही याच मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे. देशातील कोरोनाची स्थिती अद्याप गंभीर असल्याने सरकारने विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे लक्षात घ्यावे असे त्यांनी म्हटले आहे. 

जेईई आणि नीट परीक्षा रद्द करा: चौधरी

 कोविड-19 जोपर्यंत स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत जेईई आणि नीट परीक्षा रद्द करावी अशी मागणी लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

चौधरी यांनी तसे ट्विट केले आहे. जेईई आणि नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी जेव्हा परीक्षा केंद्रावर जातील तेव्हा ते प्रचंड तणावाखाली असतील त्याचा विचार करून पतंप्रधान मोदी यांनी ही परिक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्याबाबत देशातील काही पक्षांबरोबर राज्यही आग्रही आहेत. काहींना ही परीक्षा व्हावी असे वाटते. मात्र आता कॉंग्रेसही ही परीक्षा होऊ नये यासाठी आग्रही आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख