मराठा आरक्षणावार अध्यादेशाचा पर्याय : शरद पवार यांनी सुचविला तोडगा - we will bring ordinance to restore Maratha reservation says Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणावार अध्यादेशाचा पर्याय : शरद पवार यांनी सुचविला तोडगा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

मराठा आरक्षण टिकविण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू....

नवी दिल्ली : मराठा आरक्षणप्रकरणी सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न असून ते अबाधित ठेवण्यासाठी अध्यादेशाचा पर्याय असल्याचे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच याबाबत सकारात्मक पर्याय काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून विरोधकांना यावर राजकारण करायचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी विविध विषयांवर मते केली. त्यात मराठा आरक्षणावर सरकार मराठा आरक्षणाबाबत लवकरच तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा असून त्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावर आता काय निर्णय घेतात पाहूया,” असे त्यांनी सांगितले.

शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. मात्र, या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत आहे.

या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.  मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची काल बैठक झाली. मराठा तरुणांनी संयम बाळगावा, असे आवाहन चव्हाण यांनी या बैठकीनंतर केले होते. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठविण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख