फडणवीस यांना उघड पाडलं पाहिजे : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला - We should expose Devendra Fadnavis says Mahavikas Aghadi ministers | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस यांना उघड पाडलं पाहिजे : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

वैदेही काणेकर
बुधवार, 24 मार्च 2021

मुख्य सचिव सीताराम कुंटे लवकरच पत्रकार परिषद घेणार

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन संचालक रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग चर्चेचा विषय ठरले. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो, फोन टॅप होत असतील तर कामे कशी होतील, फडणवीस यांना उघड पाडलं पाहिजे, अशा स्वरूपाची मते बहुतेक मंत्र्यांनी मांडली.

मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर सभागृहातून सर्व अधिकारी बाहेर पडले. त्यानंतर फक्त कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याच उपस्थितीत महत्वाची चर्चा झाली. या चर्चेत अर्थातच भाजपकडून सातत्याने होत असलेल्या गंभीर आरोपांवर चर्चा करण्यात आली. 'अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो.  फोन टॅप होत असतील तर कामं कशी होतील.अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा कसा? देवेंद्र फडणवीस यांना उघडं पाडलं पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे, अशी मते मांडली. 

सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण म्हणाले की मंत्री म्हणून आपण काम कसं करणार? फोन टॅप होतात. असं होत असेल तर ही गंभीर बाब आहे. आपण एकत्र लढलो पाहिजे. जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी एकत्र म्हणणे मांडले. ``देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढले पाहिजे. देवेंद्र फडणीस यांना उघडं केलं पाहिजे. आपण अधिका-यांना ओळखण्यात कमी पडतोय? 
अधिका-यांवर विश्वास ठेवायचा कसा, अशी भूमिका मांडली. माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. माझ्याकडून कोणताही पैशांचा व्यव्हार झालेला नाही, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वेळा पुन्हा केला. 

सर्वच पक्षाच्या मंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली. या प्रकरणात लवकरच कारवाई होण्याचे संकेत महाविकास आघाडीकडून सध्या व्यक्त केले गेलेत. शिवाय यामागे डोकं कोणाचं आहे हे तरी तूर्तास शोधलं असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे लवकरच पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगवर स्पष्टीकरण करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. कुंटे हे गेल्या वर्षी गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते.  त्यांची परवानगी न घेताच रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टँपिंग केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केला. त्यावर आता कुंटे हे स्पष्टीकरण देणार आहेत. एकूण १३ मंत्री वर्षावर दाखल 

मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर प्रमुख तेरा मंत्र्यांची आणि नेत्यांची मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा या ठिकाणी पुन्हा बैठक बोलविण्यात आली. राष्ट्रवादीकडून अजित पवार,  अनिल देशमुख, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ,  काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पाटोले, अशोक चव्हाण,  शिवसेनेकडून दादा भुसे, एकनाथ शिंदे, अनिल परब,  सुभाष देसाई  `वर्षा`वर दाखल झाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख