राष्ट्रवादी- भाजपमध्ये काट्याची टक्कर.. पंढरपुरात मतदानास प्रारंभ  - Voting begins for Pandharpur Assembly elections Bhagirath Bhalke Samadhan Avtade | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी- भाजपमध्ये काट्याची टक्कर.. पंढरपुरात मतदानास प्रारंभ 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्यातच प्रमुख लढत होत आहे.

पंढरपूर  : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून  मतदानाला शांतेत  सुरवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत 4.42 टक्के इतके मतदान झाले. यामध्ये  8 हजार 183 महिला तर पुरूष 13 हजार 705 इतक्या मतदारांनी आपला मतदान केले आहे. एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार या 19 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असून आज 524 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान केले जाणार आहे. यावेळी कोरोनाबाधित मतदारांना सायंकाळी 6 ते 7 यावेळेत मतदान करता येणार आहे .

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्यातच  प्रमुख लढत होत आहे. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आम्हीच विजयी होणार अशी घोषणी केली असली तरी हि निवडणूक अतिशय घासून व चुरशीची होत आहे. निवडणुकीत काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.  

या निवडणुकीत भाऊ बंधकी भाजपाला अडचणीची ठरायची शक्यता आहे . स्वाभिमानी , वंचित आणि अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात भाजप व राष्ट्रवादी शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील , शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे , वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मधुकर मोटे आणि सिद्धेश्वर अवताडे हे प्रमुख काही उमेदवार आहेत. सिद्धेश्वर अवताडे हे भाजपच्या समाधान अवताडे यांचे चुलत बंधू आहे.
 
''वडिलांना आर्शीवाद,  मायबाप जनतेचे प्रेम त्यांच्या जोरावर ही निवडणूक लढत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भलके यांनी मतदानानंतर व्यक्त केली. तर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे म्हणाले की बुथची व केंद्राची संख्या वाढविल्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही, निवडणुकीत आमचा विजय नक्की होईल.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख