बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 71 जागांसाठी मतदानाला सुरवात  - Voting begins for 71 seats for the first phase in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 71 जागांसाठी मतदानाला सुरवात 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

राज्याचे मुख्य निवडून अधिकारी संजयकुमार सिंह यांनी सांगितले, की 71 मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली आहे.

पाटणा :बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सकाळी मतदानाला सुरवात झाली असून सोळा जिल्ह्यातील 71 मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणताही अनुचूतीत घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. 

राज्याचे मुख्य निवडून अधिकारी संजयकुमार सिंह यांनी सांगितले, की 71 मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम अटींचे पालन करण्यात येत असून हे नियम पाळूनच मतदान होणार आहे. आज दोन कोटी 14 लाख, 84 हजार 787 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.निपष्क्षपणे आणि शांततेत मतदान सुरू आहे. 

प्रत्येक मतदान केंद्रावर निम लष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या सर्व जिल्ह्यासांक्ष 31,380 मतदान केंद्रे आहेत. तसेच इव्हीएम मशीन तसेचे व्हीव्हीपीएटीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 41 जागा लढवित आहे यापैकी 35 जागी पासवान यांच्या पक्षाच्या उमेदवारांची टक्कर जेडीयू अर्थात नितीशकुमार यांच्या पक्षाशी होणार आहे. पासवान यांनी भाजपपेक्षा जेडीयूच्या विरोधात भूमिका घेतली आहे. जेथे जेडीयूचे उमेदवार आहेत तेथे पासवान यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. 

दरम्यान, तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य करीत आहे. खरंतर नितीशकुमार मानसिक आणि शारिरीकदृष्ट्याही थकले आहे. त्यांनी पंधरा वर्षे बिहारवर राज्य केले. सत्ता उपभोगली आणि ते आता म्हणत आहेत, की राज्यातील लोकांना रोजगार द्यायचा तर पैसे आणणार कोठून ! मी या मंडळींना सांगू इच्छितो की यांनी आतापर्यंत साठ घोटाळे केले आहे. हे पैसे बिहारच्या तीस हजार कोटीचे आहेत यांनी खालेले पैसे गेले कोठे ? याचं उत्तर प्रथम नितीशकुमार यांनी आम्हाला द्यायला हवे असा सवाल यादव प्रत्येक सभेत त्यांना करीत आहेत. 

नितीशकुमार जातीयवादाला प्रोत्साहन देतात 
लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा चिराग पासवान यांनीही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे. नितीशकुमार हे जातीयवादाला प्रोत्साहन देतात याचे मला आश्‍चर्य वाटते. जी व्यक्ती जातीयवादाला पाठिंबा देते अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास काय करणार असा सवालही त्यांनी केला आहे. चिराग पासवान आणि तेजस्वी यादव हे दोन्ही तरूण नेते नितीशकुमारांवर प्रत्येक सभेत तुटून पडताना दिसत आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख