विखेपाटील म्हणतात, "" कुणी सांगावे, शिवसेना-भाजपची युती देखील होईल !''  - Vikhepatil says, "Who knows, there will be a Shiv Sena-BJP alliance too!" | Politics Marathi News - Sarkarnama

 विखेपाटील म्हणतात, "" कुणी सांगावे, शिवसेना-भाजपची युती देखील होईल !'' 

सतीश वैजापूरकर
रविवार, 23 ऑगस्ट 2020

येथील पंचायत समिती कार्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त विखेपाटील यांच्याबरोबरच शिवसेनेचे खासदार लोखंडे हे ही उपस्थित होते.

राहाता : "" तुम्ही युतीचे खासदार म्हणून निवडून गेलात. आता महाविकास आघाडीचे खासदार झालात. हरकत नाही, कुणी सांगावे, आपली पुन्हा युती देखील होईल असे भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले आणि उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या. 

येथील पंचायत समिती कार्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त विखेपाटील यांच्याबरोबरच शिवसेनेचे खासदार लोखंडे हे ही उपस्थित होते. विखे यांनी खासदार लोखंडे यांच्या उपस्थित हे विधान केल्याने भविष्यात शिवसेना-भाजप युती होईल का याची कुजूबूज सुरू झाली. 

"कही पे निगाहे, कही पे निशाना ' हा विखे पाटील यांच्या राजकारणाचा स्थायीभाव आहे. राहात्यातील कालच्या कार्यक्रमाल निमंत्रित म्हणून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली. विखे पाटील चांगले प्लॅनर आहेत, असे विधान लोखंडे यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर विखे पाटील यांच्या डोक्‍यात नेमका काय प्लॅन असावा, असा प्रश्न उपस्थितांना पडला. 

विखे पाटील म्हणाले, "" तुम्ही युतीचे खासदार म्हणून निवडून गेलात. आता महाविकास आघाडीचे खासदार झालात. हरकत नाही, कुणी सांगावे, आपली पुन्हा युतीदेखील होईल. त्यांच्या या विधानमुळे उपस्थितांच्या भुवया पुन्हा उंचावल्या. 

कोविडमुळे अर्थकारण थंडावले, राजकारण नाही. एरवी फारसे एकत्र न येणारे हे दोन नेते अनपेक्षितपणे एकत्र आले. त्यामागे काही तरी कारण असणार. आजवरचा अनुभव पहाता विखे पाटील विनाकारण काहीही करीत नाहीत. 

लोखंडे यांनी विखे पाटील यांच्या उल्लेख चांगले प्लॅनर असा केला. श्रीरामपूर नगर पालिकेची निवडणुक वर्षभरावर आली. त्यामुळे त्यांनी सोंगट्या टाकायला सुरवात केली नाही ना. लोखंडे यांचे या पालिकेच्या राजकारणात फारसे स्थान नाही. बोलणी करायची वेळ आली तर शिवसेनेपूरती त्यांची भुमिका महत्वाची ठरू शकते एवढेच. विखे पाटील यांची श्रीरामपूर शहर व मतदारसंघावर बारीक नजर आहे. तेथे त्यांना एका दगडात दोन तीन पक्ष्यांची शिकार करायची आहे. 

एकाच वेळ अनेक आघाड्यावर लढाई सुरू ठेवण्याची क्षमता आणि ताकद विखेपाटील यांच्याकडे आहे. इकडे शिवसेनेचे लोखंडे त्यांच्या व्यासपिठावर येतात. त्याचवेळी राहूरीचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे खासदार डॉ.सुजय विखे पाटील दिल्लीला जातात. फुरसतीच्या काळात डॅमेज कंट्रोल आणि बेरजेचे राजकारण करायचे. गरजेच्या वेळी त्याचा फायदा होऊ शकतो. किमान त्यात तोटा काही नसतो. 

लोखंडे हे दोन वेळा लाटेवर स्वार होत खासदार झाले. मतदारसंघातील प्रस्थापितांच्या राजकारणात डोकवायचे नाही. गट बांधणी करून संघर्ष करायचा नाही. ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्यांची प्रस्थापितांना अडचण होत नाही. त्यांनाही आपल्या चिरंजिवांना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून आमदार करण्याची इच्छा आहे.

उद्या राज्यात खरोखरच राजकीय समीकरणे बदलली. तर विखे पाटील यांचा आधार कुणाला नको आहे. असा व्यवहारी विचार करून त्यांनी कालच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असणार. नाही म्हणायला, आम्ही विकासकामाच्या निमित्ताने एकत्र आलो. यात राजकारण नाही. असे सांगायला लोखंडे विसरले नाहीत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख