आता लस कुठे मिळणार ? खासदाराचे आरोग्यमंत्र्यांना पत्र  - Vikas Mahatme letter to MP Bharti Pawar-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

आता लस कुठे मिळणार ? खासदाराचे आरोग्यमंत्र्यांना पत्र 

संदीप पंडित 
बुधवार, 28 जुलै 2021

लसीकरण केंद्र बंद झाल्याने आता लस कुठे मिळणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

विरार  : राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. न्यायालयाने तर घरोघरी जाऊन लसीकरण करता येईल का ? याची तपासणी करण्यास सांगितले असताना वसई विरारकरांना मात्र पहिला डोस घेण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिकेने सुरु केलेली लस व्हॅन आणि लसीकरण केंद्र बंद झाल्याने आता लस कुठे मिळणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

आमदारांवरील खटला मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे Vikas Mahatme यांनी या सगळ्या बाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार Bharti Pawar यांना पत्र पाठवून महापालिकेला लस पुरवण्याबरोबरच लसीकरण केंद्रे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. 

            
राज्यात मोठ्या प्रमाणत लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, वसई- विरार मध्ये मात्र आतापर्यंत अवघे १३ टक्के लसीकरण झाले आहे. पालिका हद्दीतील नागरिकांना लस व्यवस्थितरित्या मिळावी यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रे ही सुरु करण्यात आली होती. परंतु सध्या लस उपलब्ध होत नसल्याने त्यातील काही लसीकरण केंद्रे बंद केली आहेत.  ग्रामीण भागातील नागरिकांच्या लसीकरणाला त्याचा फटका बसू लागला आहे. याची दखल घेत डॉ. विकास महात्मे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पत्र लिहून यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. 

ठाकरे सरकारची बदनामी करणं एसटी कर्मचाऱ्यांला पडलं महागात
गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी फक्त 13 टक्के इतकेच लसीकरण झाले आहे. त्यातच आता तर पाहिलं डोस हि बंद झाला आहे. येणारी लस फक्त दुसरा डॉस ज्यांचा शिल्लक आहे त्यांच्यासाठीच आहे.  25 लाख लोक संख्या असलेल्या महानगर पालिकेतील युवा वर्ग हि लसीच्या पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहे. वसई विरार महापालिकेच्या बाजूला असलेल्या मीरा भाईंदर आणि ठाणे महापालिकेत वसई विरार पेक्षा जास्त लसीकरण होत आहे. तरी आपण याठिकाणी जास्त लस उपलब्ध करून द्यावी. लसीकरणासाठी असलेली केंद्रे बंद न करता त्यात अजून वाढ करावी जेणे करून ग्रामीण भागातील नागरिकांनाही लस उपलब्ध होऊ शकेल. तरी आपण या  प्रश्नात स्वतः लक्ष घालावे. जनतेला लस उपलब्ध करून द्यावी. अशी विनंती या महात्मे यांनी या पत्रात केली आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख