आंबेडकरांच्या वाढदिवसाचा जल्लोष पडला महागात...व्हिडिओ व्हायरल.. पोलिस निलंबित..दहा जणांवर गुन्हा

आंबेडकरांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
4Ad._Prakash_Ambedkar_0_0.jpg
4Ad._Prakash_Ambedkar_0_0.jpg

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे  सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर ,Prakash Ambedkar यांचा वाढदिवसाचा जल्लोष करणे कार्यकर्त्यांना चांगलेच भोवले. आंबेडकरांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  Prakash Ambedkar birthday celebration Video goes viral Police suspended 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरच्या जवळ १० मे रोजी रात्री केक कापून जल्लोष करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधक ठरली. भीमनगरमध्ये गर्दी दिसून आल्याने आणि फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचे पाहून डाबकी रोड पोलिसांनी घटनास्थळ आले. या वेळी तेथे नागरिकांची मोठी गर्दी होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत आठ दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ता. १० मे रोजी रात्री  या वाढदिवस जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जल्लोषाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी वाढदिवस आयोजित करणाऱ्यांसह सहभागी असणाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अकोल्यातील जुने शहरातील भीमनगरमध्ये नागरिकांनी एकच गर्दी करून फटाके फोडून प्रचंड आतषबाजी केली. संचारबंदीच्या नियमांचे ते उल्लंघन असल्याने डाबकी रोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर हा सर्व प्रकार एका पोलिस कर्मचाऱ्याच्या  उपस्थितीत झाल्याने अश्विन शिरसाट या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा  ६७ वा वाढदिवस. राज्यात लॉकडाऊन असल्याने कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन तोडून शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. कार्यकर्त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या परिसरातच बाळासाहेबांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा केला.  प्रकाश आंबेडकर यांनी वाढदिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे कोवॅक्सिन लस घेतली. त्यावेळी भोसरी हॉस्पिटलच्या अधिष्ठाती डॉ. शैलजा भावसार,  वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राहुल कलाटे उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com