फडणवीसांसमोरच राणे दरेकरांना म्हणाले...'थांब रे, मध्ये बोलू नको'

नारायण राणे चिपळूणमध्ये असताना प्रशासकी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हेत.
फडणवीसांसमोरच राणे दरेकरांना म्हणाले...'थांब रे, मध्ये बोलू नको'
Narayan Rane .jpg

चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकताच पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी नारायण राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणे यांनी गप्प केले. 'थांब रे, मध्ये बोलू नको' असे राणे दरेकरांना बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील विरोधी पक्षनेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (Video of Narayan Rane and Praveen Darekar goes viral) 

पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना राणे यांनी मध्येच थांबवले.  

नारायण राणे चिपळूणमध्ये असताना प्रशासकी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हेत. असा आरोप राणे यांनी केला होता. तर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले होते की ''प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम, प्रोटोकॉल माहिती नाही. एकही अधिकारी मला भेटला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात बसले आहेत. विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री आले असताना नाही ते आले नाहीत. त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुख्य सचिवांपासून संबंधित विभागाकडे तक्रार करून कारवाई करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. असे अधिकारी चिपळूणमध्ये ठेवू नका. ठेवले तर मी त्यांना खूर्चीवर बसू देणार नाही. मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले, ते पाहूणे आहेत का? पुढीलवेळी मी न सांगता येईन, मग बघू, असे राणे म्हणाले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राणे अधिकाऱ्यांना म्हणतात तुम्हाला त्या मॉबमध्ये सोडू का आता? दरेकर मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा राणे दरेकरांच्या दिशेने हात करत म्हणतात 'थांब रे, मध्ये बोलू नको' राणे पुन्हा अधिकाऱ्यांना म्हणतात ''काय चेष्टा समजली? एवढी लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. मग, त्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले तुम्ही हसताय. दात काढताय?'' अधिकारी म्हणतात, हसत नाही सर, मी पहिल्यापासूनच इथे. इथे काय करताय. इकडे ऑफिसमध्ये काय? तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही चला दाखवा तुमचे ऑफिस कुठे आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in