. पिडितेची आई हंबरडा फोडत म्हणाली, माझ्या पोटच्या गोळ्याचा चेहराही पाहता आला नाही ! 

या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर चौबाजूने हल्लाबोल होत आहे.
 . पिडितेची आई हंबरडा फोडत म्हणाली, माझ्या पोटच्या गोळ्याचा चेहराही पाहता आला नाही ! 

हाथरस (यूपी) : यूनीत एका 19 वर्षीय दलित युवतीचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याने संपूणे देशभर पुन्हा एकदा संपापाची लाट उसळली आहे. आपल्या पोटच्या काळजाचा शेवटी चेहरा ही पोलिसांनी पाहू दिला असे सांगत पडित युवतीच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला.

पोलिसांनी माझ्या लेकरावर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतकी का घाई केली याचं उत्तर आम्हाला हवं, आम्हाला मायबाप सरकारनं न्याय द्यावा अशी हातजोडून विनंतीही केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कठोर शासन करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर चौबाजूने हल्लाबोल होत आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्‌विट करून या प्रकरणाचा निषेध करतानाच योगी सरकारला आरोपीच्या पिंजण्यात उभे केले आहे. पिडितीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर अंत्यसंस्कार रात्रीच का आटपून घेतले हा प्रश्‍नही केला आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पिडितीच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

हे सर्व असले तरी हाथरस प्रकरणाने निर्भयाप्रकरणाची आठवण देशाला करून दिली. ज्या दलित मुलीवर अत्याचार झाले ते निदर्यपणे केले होते. बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशाला हादरा बसला आहे. 

पिडितेच्या वडलांनी डोळ्यातून अश्रू गाळत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, की नातेवाईक सोडा आमच्या लेकराजवळ आम्हालाही जावू दिले. तिचा चेहराही नीट पाहता आला नाही. सकाळी अंत्यसंस्कार करू या अशी हातजोडून मी मागणी करीत होतो पण, पोलिसांनी ऐकले नाही. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचा मृतदेड पोलिस घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले. 

पिडितेच्या आईने आपल्या लाडक्‍या लेकीच्या नावाने हंबरडा फोडत सांगितले, की मी आणि मुलगी शेतात असताना चार-पाच नराधमांनी माझ्या मुलीवर अत्याचार केले. ज्यावेळी माझं लेकरू मला भेटलं तेव्हा तिला साध बोलताही येत नव्हतं. मला प्रचंड हादरा बसला होता. आम्ही पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली पण, दखल घेतली नाही. आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले नाही. माझ्या पोटच्या गोळ्याचा चेहराही पाहता आला नाही यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते. 

गेल्या 14 सप्टेबररोजी पिडितेवर चार ते पाचजणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. या मुलीची काल प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मानेची हाडं तुटण्याबरोबरच जीभलेही जखम झाल्याचे दिसून येत आहे. बलात्कार आणि हत्याप्रकरणात पोलिसांना चार नराधमांना अटक करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com