खडसे राष्ट्रवादीत गेल्याचा भाजपवर काय परिणाम? : महाजनांचे उत्तर खडसे समर्थकांना डिवचणारे - very little imaact on bjp of exit of Khadse says girish mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे राष्ट्रवादीत गेल्याचा भाजपवर काय परिणाम? : महाजनांचे उत्तर खडसे समर्थकांना डिवचणारे

कैलास शिंदे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

भाजपमध्ये नव्यांना संधी मिळणार असल्याचा महाजन यांचा दावा.. 

जळगाव : एकनाथ खडसे यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर  पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असा दावा  भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले. खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला किंचितही फरक पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश हा भाजपसाठी नुकसानदायक नसल्याचे महाजन यांनी वारंवार स्पष्ट केले. त्यांनी किंचितही परिणाम नसल्याचे सांगून खडसे समर्थकांच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. 

खडसे यांनी भाजपाला रामराम केला आहे. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपला छळ केल्याने आपण पक्ष सोडल्याचे सांगितले. खडसे यांच्या आरोपाचे महाजन यांनी खंडन केले.

ते म्हणाले, ``खडसे यांच्याबाबत जे निर्णय घेण्यात आले ते एकट्या देवेंद्र फडणवीस यांचे नव्हते. ते सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे होते. फडणवीस हे नेते असल्याने त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे फडणवीस यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे.``

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपचे जळगाव राज्यात जिल्ह्यात मोठे नुकसान होईल असे सांगितले जात असल्याच्या वृताचेही त्यांनी खंडन केले. ते म्हणाले की या अगोदरही देश पातळीवर भाजपला अनेक नेते सोडून गेले. त्यामुळे पक्षावर कोणताही फरक पडला नाही. उलट हेच गेलेले नेते भाजपत परत आले. त्यामुळे खडसे यांच्या जाण्यामुळे काहीही तोटा होणार नाही. उलट पक्षात नवीन लोकांना संधी मिळणार आहे. त्यामुळे पक्ष अधिकच बळकट झालेला दिसणार आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला जिल्ह्यातील स्थानिक नेते

खडसे उदया(त.२३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिह्यातील स्थानिक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती  जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.  खडसे व त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे हेलिकाॅप्टरने रवाना झाले आहेत.    

या प्रवेश  सोहळ्यासाठी जळगाव पक्षाचे जिल्ह्यातील स्थानिक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली आहे. पक्षाचे जिल्ह्यातील आमदार अनिल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, माजी मंत्री डॉ. सतीश   पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूनभाई गुजराथी उपस्थित राहणार आहेत. खडसे यांच्या प्रवेशाबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुंबुई येथे जिल्हातील नेत्यांची बैठक घेतली होती त्या वेळी काही जणांनी विरोध केला होता.त्यामुळे खडसे यांच्या प्रवेशाला कोण कोण नेते उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख