भाजी विकून पोट भरणारा झाला नगरपालिकेचा अध्यक्ष

बेरोजगारीमुळे कुटूंब चालविणे कठीण होत होते. म्हणून त्यांनीआपल्या गावातच भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
Vegetables seller elected as a Head Civic Body in andhra pradesh
Vegetables seller elected as a Head Civic Body in andhra pradesh

अमरावती : आंध्र प्रदेशमधील नगरपालिका व महापालिकांमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पक्षाने ८६ पैकी ८४ पालिकांवर कब्जा केल्याने विरोधकांचा सुफडा साफ झाला आहे. या निवडणुकांनंतर जगन मोहन यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यातच त्यांनी पालिकांच्या अध्यक्ष निवडीतही वेगळेपण दाखवत मागास घटकांनाही प्रतिनिधित्व दिले आहे.

राज्यातील रायचोटी नगर पालिकेमध्ये शेख बाशा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बाशा यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पदवी असूनही नोकरी मिळत नव्हती. बेरोजगारीमुळे कुटूंब चालविणे कठीण होत होते. म्हणून बाशा यांनी आपल्या गावातच भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. भाजी विकून पोट भरणे, हाच त्यांचा दिनक्रम असायचा. त्यांच्यापुढे दुसरी कोणतीही दिशा नव्हती. 

पण आंध्र प्रदेशातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या अन् भाशा यांच्या नशीबच पालटले. वायएसआर काँग्रेसने त्यांना नगरसेवकाचे तिकीट दिले. रायचोटी नगरपालिकेत ते विजयी होऊन गेलेही. पण लगेच त्यांना दुसरा सुखद धक्का बसला. मुख्यमंत्री रेड्डी यांनी गुरूवारी बाशा यांना थेट नगरपालिकेच्या अध्यक्षपदी विराजमान केले. 

अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल बाशा यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यासारख्या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील लोकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी अनेक जागांवर मागास घटकातील उमेदवार उभे केले होते. 

आंध्र प्रदेशात जगन मोहन यांची त्सुनामी

आंध्र प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आज मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची त्सुनामी पाहायला मिळाली. पक्षाने राज्यातील सर्व ११ महापालिकांवर कब्जा केला आहे. तर ७५ पैकी ७३ नगरपालिकांवरही जगन मोहन यांच्याच पक्षाचा झेंडा फडकला आहे.

आंध्र प्रदेशातील ११ महापालिका व ७५ नगरपालिका निवडणुकीची नुकतीच मतमोजणी झाली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. विशाखापट्टणम, विजयवाडा आणि गुंटूर या शहरांवर नायडू यांची पकड होती. पण जगन मोहन रेड्डी यांनी या तिन्ही महापालिका खेचून आणल्या आहेत. तेलुगू देसमला या निवडणुकीत अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांचा दहाचा आकडाही गाठता आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com