नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज अठरावा दिवस आहे. आंदोलनाचा जोर आणखी वाढत आहे. आज टॅंकरने रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांनी आंदोलन संपविण्याचा निर्णय घेतला आहे. चिल्ला बॅार्डरवरून शेतकरी बाजूला झाले आहेत.
कृषी आयोग बनविण्यास सरकारने सहमती दर्शविल्यानंतर शेतकरी रस्त्यावरून बाजूला झाले आहेत. नोएडा-दिल्ली वाहतूक सुरू झाली आहे. येथील पोलिस बंदोबस्त हटविण्यात आला आहे. हा रस्ता बारा दिवसांनी सुरू होत आहे. शेतकरी आणि सरकार यांची आज दुपारी बारा वाजता बैठक आहे. सेक्टर 14 मध्ये शेतकरी किसान युनियन (भानू गट)चे वरिष्ठ पदाधिकारी याबाबतचा निर्णय घेणार आहे.
सरंक्षण मंत्री राजनाथसिंह, आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर काल रात्री उशिरा चिल्ला बॅार्डरवर जाऊन शेतकऱ्यांना भेटले. त्यांनी शेतकऱ्यांची याबाबतची चर्चा केली. त्यानंतर चिल्ला सीमा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनात सहभागी होण्यासाठी सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश येथून टॅकर घेऊन निघाले आहेत.
कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक..मोबाईल टॅावर तोडण्याचा प्रयत्न. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews https://t.co/gSCUFO96hm
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 13, 2020
शेतकरी मरत आहे. त्याला कुणी वाचविणार आहे काय ?
मुंबई : कृषी कायद्यावरून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींचे सरकार हे तीन कायदे घेऊन आले. या कायद्यांची काळी बाजू काय ते निदान महाराष्ट्राने तरी समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांसंदर्भातले नवे कायदे हे मर्जीतल्या बड्या उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी बनवले. शेतकरी ज्या कायद्यांच्या विरोधात उभा ठाकला आहे, त्या तीन कायद्यांची माहिती किती जणांना आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची याचना कवडीमोलाची ठरत आहे. शेतकरी मरत आहे. त्याला कुणी वाचविणार आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी 'सामना'तील 'रोखठोक'मधून उपस्थित केला आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या भावना नाहीत हा अपप्रचार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून जे तीन कायदे मोदी सरकारने आणले ते नक्की काय आहेत? ते कायदे म्हणजे शेतीचे थडगे व शेतकऱ्यांचे मरण आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी हा विषय लोकांना समजावून सांगायला हवा, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

