अमेरिका करणार भारताला लशींचा पुरवठा..जो बायडन यांची घोषणा.. - US to supply vaccines to India Joe Biden | Politics Marathi News - Sarkarnama

अमेरिका करणार भारताला लशींचा पुरवठा..जो बायडन यांची घोषणा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 जून 2021

भारताला लशींना पुरवठा करण्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेवर दबाब वाढत होता.

वाशिंगटन: अमेरिकेच्या ग्लोबल वॅक्सीन पॉलिसी अंतर्गत जगाला लशींचे  वाटप करण्याच्या योजनेची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. बायडन प्रशासनाच्या योजनेनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या ‘कोवॅक्स ’ योजनेत  75 टक्के अतिरिक्त डोस पुरविला जाईल. प्रशासनाने असे म्हटले आहे की , अतिरिक्त 25 टक्के डोस आपातकालीन स्थितीत  संबंधित देशांना थेट पाठवण्यासाठी  राखीव ठेवण्यात येतील. US to supply vaccines to India Joe Biden

दक्षिण आशियाई देशांमध्ये ७० लाख  आणि आफ्रिकेत ५० लाख 
डोस देण्यात येतील. या व्यतिरिक्त लसीची ६०  लाख डोस थेट भारत, कॅनडा, मेक्सिको आणि कोरिया येथे दिले जातील. बायडन प्रशासनाने सांगितले की, हे काम ते कोणत्याही देशाचा पाठिंबा घेण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी करत आहेत.  व्हाईट हाऊसने यापूर्वी असे म्हटले आहे की जूनच्या अखेरीस ८ कोटी  डोस चा पुरवठा केला जाईल . त्यापैकी जवळपास १  कोटी ९० लाख कोवॅक्सअंतर्गत लस असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोविडच्या अतिरिक्त ७५ टक्के लशी या संयुक्त राष्ट्रच्या सहयोगाने दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिकामध्ये वितरीत करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार पहिल्या टप्यात अडीच कोटी कोवॅक्स लशींचे वितरण करण्यात येणार आहे.  

विजय मल्ल्याला मोठा झटका..बॅंका विकणार त्यांची जप्त केलेली संपत्ती 

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य देशांच्या पंतप्रधानांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी सांगितले की अमेरिका संबंधित देशांना लशींचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले.  जो बायडन यांनी सांगितले की, कमीत कमी ७५ टक्के कोवॅक्स लशींचे वितरण करण्यात येणार आहे. यात अमेरिका आणि  कैरेबियन देशांना साठ लाख, दक्षिण आणि दक्षिण- पूर्व आशियासाठी ७० लाख आणि अन्य देशांना ५० लाख लशींचे वितरण आफ्रिकेला करण्यात येणार आहे. ज्या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा देशांना साठ लाख लशी देण्यात येणार आहेत. यात भारत, कॅनडा, कोरिया, मॅक्सिको यांचा समावेश आहे.  

भारताता लशींचा तुटवडा असल्याने भारताला लशींना पुरवठा करण्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेवर दबाब वाढत होता. कॅनडा आणि मॅक्सिकोला अमेरिकेने ४० लाख लशींचा पुरवठा केला आहे. या महिन्यात अमेरिका आठ कोटी लशींचे वितरण करणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख