तुम्हालाही मुलंबाळं आहेत.. घरंदारं आहेत.... : नारायण राणेंचे पुन्हा आव्हान

मुख्यमंत्र्यांनीही थोबाड फोडण्याची भाषा केल्याचा दावा..
narayan rane
narayan rane

मुंबई : माझे कोणी वाकडे करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. शिवसेनेच्या वाढीत माझा मोठा सहभाग आहे. आता जे शिवसेनेत आहेत तेव्हा ते तेव्हा नव्हते. तेव्हा माझी भाषा त्यांना खटकली नाही. पण तुम्ही माझ्याविरुद्ध आंदोलन करू मला घाबरवू शकत नाही. तुम्हालाही मुलंबाळं आहेत. घरंदारं आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा शिवसेनेला आव्हान दिले.

राणे यांनी आज पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला. त्यात माझा काय गुन्हा होता, हे मला कळाले नसल्याचे पुन्हा सांगितले. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मी ते वाक्य पुन्हा उच्चारणार नाही. पण अशीच भाषा शिवसेनेच्या इतर नेत्यांनी वेळोवेळी वापरली होती, असा दावा त्यांनी केला.  

ते म्हणाले,  ``गेले काही दिवस माझी यात्रा सुरू असताना जे काही टिव्हीवर येत होते, त्याची सगळी माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा उठवतात, हे माझ्या लक्षात आले आहे. पण त्यावर मी आता बोलणार नाही.``

ही यात्रा कशासाठी होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत केलेली कामे ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हे सांगण्यासाठी ही यात्रा होती. देशाच्या मंत्रीमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतले. राज्य आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनविण्यात आले. या सर्वांना मोदींनी आपल्या राज्यात पाठविले आणि जनतेचे आशीर्वाद घ्या, असे सांगितले. त्याप्रमाणे मी 19 पासून माझ्या यात्रेला सुरवात केली. काल, आज आणि उद्या ही यात्रा बंद आहे. पण मी परवापासून सिंधुदर्गापासून पुन्हा यात्रा सुरू करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी काय बोललो, हे पुन्हा सांगणार नाही. पण एखादी गोष्टी भूतकाळात घडली. त्याबद्दल काही विधान केले तर तो गुन्हा कसा घडतो, हे मला कळाले नाही. मात्र अशी वक्तव्ये शिवसेनेच्या नेत्यांनी या आधी केली नाहीत का? अशीच विधाने मुख्यमंत्री यांनी केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेनाभवन फोडले तर त्याच्या थोबाडीत मारेन, असे मुख्यमंत्री बोलले होते. तो गुन्हा नाही का? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही चपलेने बडवले पाहिजे, असे ठाकरे बोलले होते. अमित शहांना ठाकरे हे निर्लज्ज म्हणाले होते. काय ही भाषा? काय हे संस्कार? शरद पवार तुम्ही पाहतायना. अशी भाषा वापरणाऱ्यांना पवार यांनी मुख्यमंत्री केले, असा टोला राणे यांनी लगावला. 

माझा पक्ष माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, असे सांगत जे. पी. नड्डांपासून ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्य़ंत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com