खंडणीच्या गुन्ह्यात युनियन लीडरला अटक.. 'एमपीसीबी'चा अधिकारी सुद्धा आऱोपी - union leader arrested for ransom mpcb officer also accused | Politics Marathi News - Sarkarnama

खंडणीच्या गुन्ह्यात युनियन लीडरला अटक.. 'एमपीसीबी'चा अधिकारी सुद्धा आऱोपी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

डॉ. जितेंद्र संघेवार असे या प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याचे नाव असल्याचे गुन्हा दाखल झालेल्या पिंपरी पोलिसांनी सांगितले.

पिंपरी : प्रदूषण करीत असल्यामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) बंद केलेली पिंपरी-चिंचवडची कंपनी पु्न्हा सुरु करण्यासाठी एमपीसीबीच्या पुणे प्रादेशिक अधिकाऱ्याने वीस लाख रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध उद्योगनगरीत खंडणीचा गुन्हा काल दाखल झाला. त्यात या अधिकाऱ्याच्या वतीने एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना युनियन लीडरला पोलिसांनी अटक केली. त्याला २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

डॉ. जितेंद्र संघेवार असे या प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याचे नाव असल्याचे गुन्हा दाखल झालेल्या पिंपरी पोलिसांनी सांगितले. संघेवारच्या वतीने खंडणीचा पहिला हफ्ता तळेगाव दाभाडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील युनीयन लीडर कैलास नरके याने काल कल्याणीनगर येथील हॉटेलात घेतला होता. आशिष आरबाळे आणि पंढरीनाथ साबळे हे इतर दोन आरोपीही या गुन्ह्यात आहेत. याबाबत कपील पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

ते चिंचवड येथील स्टार इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनीत सीईओ आहेत. तर, आशिष हा या कंपनीचा सल्लागार आहे. कंपनीतील प्रदूषित पाणी विना प्रक्रिया सोडले  जात असल्याने जलप्रदूषण होत असल्याची माहिती पंढरीनाथ या दुसऱ्या आरोपीला दिली.त्याने ती नरकेला दिली. तर, नरकेने त्याबाबत एमपीसीबीकडे तक्रार केल्याने सदर कंपनी बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु करण्यासाठी तसेच कंपनीविरुद्धची तक्रार मागे घेण्याकरिता वरील पैशाची मागण्यात आले होते.

अंबरनाथ पालिकेच्या कर निरीक्षकाला लाच घेताना अटक  
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या कर विभागातील कर निरीक्षकाला अँटी करप्शन विभागाच्या पथकाने सापळा रचून काल सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे.  देवसिंग पाटील असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याकडून 5 हजार 600 रुपयांची घेतलेली लाच पथकाने हस्तगत केली आहे. याघटनेमुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान देवसिंग पाटील हा अंबरनाथ पालिकेचे लिपिक असून त्यांच्याकडे कर विभागाच्या निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. तक्रारदाराच्या अंबरनाथ येथील घराला  टॅक्स लावण्यासाठी त्याने लाच  मागितली होती. तडजोडी अंती 5 हजार 600 रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याबाबत ठाणे अँटीकरप्शन विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यालयात सापळा रचत त्याला लाच स्वीकारताना  रंगेहाथ अटक केली. लाचखोर  पाटील याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात लाच खोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख