अजित पवारांनी मागणी केली अन् मोदी सरकारने तातडीने उचलली पावले

हा मंत्रीगट कोरोना औषधांवर जीएसटी सवलतीच्या आवश्यकतेची तपासणी करेल तसेच त्यावर शिफारस करेल.
  Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मागणीची दखल केंद्रीय वित्त मंत्रालयाने घेतली. कोरोना संबंधित आवश्यक वस्तूंवर जीएसटीत सवलत देण्याची आग्रही मागणी पवार यांनी शुक्रवारी झालेल्या ४३ व्या जीएसटी परिषदेत केली होती. या मागणीची दखल घेत केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशभरातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांची समिती स्थापन केली. (The Union Finance Ministry took note of Ajit Pawar's demand)

या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ही समिती जीएसटी माफी आणि सवलती देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ८ जून रोजी आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर या अहवालावर केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखाली समिती अहवाल तयार करणार आहे. 

या समितीमध्ये गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, अजित पवार, गोव्याचे मंत्री मौविन गोडीन्हो, केरळचे अर्थमंत्री के.एन. बालागोपाल, ओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुयारी, तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव, उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  हा मंत्रीगट कोरोना औषधांवर जीएसटी सवलतीच्या आवश्यकतेची तपासणी करेल तसेच त्यावर शिफारस करेल. समितीच्या अहवालावरुन केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. 

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे झालेली महसूल हानी व आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नसल्याने, महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी वर्ष २०२२-२३ ते वर्ष २०२६-२७ असा पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. पेट्रोल, डिझेल वस्तुंवरील विविध उपकर आणि अधिभारापोटी केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. वर्ष २०२०-२१ मध्ये सुमारे ३.३० लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांचे हात बळकट करण्यासाठी या निधीचे राज्यांना सुयोग्यपणे वाटप करावे, अशा मागणीही त्यांनी केली होती.

कोरोना लस, औषधे, कोरोना तापसणी किट, मेडिकल ग्रेड, ऑक्सिजन, पल्स ऑक्सिमीटर, हँड सॅनिटायझर्स, ऑक्सिजन थेरपी उपकरणे, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर, ऑक्सिजन जनरेटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, मास्क यांच्यासह कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तूंचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com