मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात सरकारचे वकील हजर नाहीत, हे दुर्देवी : संभाजीराजे - unfortunate that government lawyers not present in the Maratha reservation court says Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात सरकारचे वकील हजर नाहीत, हे दुर्देवी : संभाजीराजे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ही सुनावणी आता पुढे गेली आहे. 

पुणे : मराठा आरक्षण प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. तत्पूर्वी राज्य सरकारचे वकील उपस्थित न राहिल्यानं काही काळ सुनावणी स्थगित करावी लागली होती. राज्य सरकारच्या या हलगर्जीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत. हे दुर्दैवी आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी खंत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी होते. तेथे हा प्रकार घडला. ही सुनावणी आता चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

याबाबत संभाजीराजे यांनी म्हटले आहे की मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या मंत्री अशोक  चव्हाणांना यापूर्वी मी अनेकदा सावध केले होतं. ही केस गांभीर्याने घेण्यासंबंधी अधिकारीववर्गाला सूचना देऊन अधिकारी आणि वकील मंडळी यामधील समन्वय त्यांनी स्वतः  साधायला हवा होता. सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना सूचना देऊन जबाबदाऱ्या निश्चित करायला  हव्यात. राज्य सरकारच्या वकिलांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ही पुराव्यानिशी भक्कम पणे मांडणे गरजेचे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख