छोटा राजनची कोरोनातूनमुक्ती...'एम्स'मधून पुन्हा तिहार तुरुंगात... - Underworld don Chhota Rajan Back To Tihar Jail From AIIMS, After Recovered From Corona | Politics Marathi News - Sarkarnama

छोटा राजनची कोरोनातूनमुक्ती...'एम्स'मधून पुन्हा तिहार तुरुंगात...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 मे 2021

छोटा राजनला एम्स रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आता त्याला पुन्हा तिहारमध्ये पाठवले आहे.

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनला Chhota Rajanएम्स रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आता त्याला पुन्हा तिहारमध्ये पाठवले आहे.  त्याला 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर 24 एप्रिलला अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. Underworld don Chhota Rajan Back To Tihar Jail From AIIMS, After Recovered From Corona

छोटा राजन याचा शुक्रवारी दिल्लीत मृत्यू झाल्याची अफवा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच छोटा राजनला कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे एम्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे 

'लेटर बॅाम्ब' नेते गुलाम नबी आझाद यांना कॅाग्रेसनं सामावून घेतलं..दिली नवीन असाइनमेंट..
 
राजन (वय 61) याचे काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियातून प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्याला बालीतून 2015 मध्ये भारतात आणले. तेव्हापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या विरोधात मुंबईत दाखल असलेले सर्व खटले केंद्रीय अन्वेषण विभागाकडे  (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहे. राजन याच्या विरोधात खंडणी आणि खुनाचे तब्बल 70 खटले प्रलंबित आहेत. राजन याला 2018 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या 2011 मधील हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच हनिफ कडावाला याच्या हत्या प्रकरणातून राजन याची मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मुक्तता केली होती. कडावाला हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होता. राजन याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 

1993च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनच्या सूचनेवरून कडावालाने मुंबईत शस्त्रे आणली होती. या स्फोटांमध्ये 250 हून अधिक लोक ठार झाले होते. 7 फेब्रुवारी 2001 रोजी कडावलाची तीन जणांनी हत्या केली होती. खून खटल्याची चौकशी करणार्‍या सीबीआयने आरोप केला होता की, लोकप्रियतेसाठी राजनने कडावालाची हत्या घडवून आणली. याआधीही राजनने स्फोट प्रकरणातील अनेक आरोपींची हत्या केली आहे. मुळचा फलटण तालुक्यातील गिरवी गावचा छोटा राजनने मुंबईत आपले बस्तान बसवले होते. ब्लॅकने चित्रपटाची तिकीट विकण्यापासून त्याचा अंडरवर्ल्डमधील प्रवास सुरू झाला. त्यानंतर अनेक वर्ष त्याने मुंबईतील गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण केला. 
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख