मुख्यमंत्री करणार आज समृद्धी महामार्गाची पाहणी..  - Uddhav Thackeray will visit Samrudhi Highway today | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री करणार आज समृद्धी महामार्गाची पाहणी.. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 डिसेंबर 2020

उद्धव ठाकरे हे आज हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.  

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. 

मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन होणार आहे.  हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे जाणार आहेत.  

दुपारी हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण करणार असून  दोन वाजता गोळवडी येथे त्यांचे आगमन होणार आहे. मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी ते करणार आहेत. दुपारी 3.10 वाजता ते हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करणार आहेत. औरंगाबाद येथून ते 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. 

हेही वाचा : वर्षभरात भाजपला दोनदा सुतक..शिवसेनेचा टोला 
 
मुंबई : पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव झाला आहे. यावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' तून भाजपवर टीका करण्यात आली आहे. "वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल," अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत, असे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख