SARKARNAMA EXCLUSIVE सोनियांच्या बैठकीला ठाकरे नाही जाणार : महाआघाडीत वाद शक्य

उद्धव ठाकरे मात्र या बैठकीबाबत काॅंग्रेसची निराशा करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे...
Sonia-Uddhav
Sonia-Uddhav

मुंबई : पेगासस हेरगिरी प्रकरण, राज्यसभेतील गोंधळ आदी मुद्यांवरून भाजपविरोधी पक्षांची एकजूट होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ही एकजूट भक्क करण्यासाठी काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी येत्या वीस आॅगस्ट रोजी विरोधी पक्षांची आॅनलाईन बैठक बोलवली आहे. मात्र या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार की नाही याची उत्सुकता आहे. (Uddhav Thackeray decides not to attend meeting called by Sonia Gandhi)

शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणे काॅंग्रेससाठी अपेक्षित आहे. उद्धव ठाकरे मात्र या बैठकीबाबत काॅंग्रेसची निराशा करणार असून ते बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे पुन्हा राज्यातील महाविकास आघाडीत वाद होऊ शकतो. शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत हे ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात ठाकरे यांचा तसा निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेना उपस्थित नसल्याने वेगळा राजकीय संदेश जाण्याची शक्यता आहे. यावर काॅंग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार, याची उत्सुकता असणार आहे.

या बैठकीबाबत बोलताना संजय राऊत यांनी सोनिया गांधींना उद्धव ठाकरेंना भेट असतील तर यात वावग काय, असा उलट सवाला केला होता. महाराष्ट्रात आम्ही सत्तेत एकत्र आहोत. यूपीएत सहभागी व्हायचे हा की नाही शिवसेनेचा प्रश्न आहे. आम्हाला आमचा गुगल मॅप माहीत आहे. शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवू नये, असे वक्तव्य आज या विषयावर बोलताना केले.

सोनिया गांधींच्या बैठकीत शिवसेनेच्या उपस्थितीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबईत पत्रकारांनी आज विचारले असता त्यांनीही सूचक उत्तर दिले. `त्यांना आधी सहभागी होऊ द्या, मग त्यावर प्रतिक्रिया देतो,`असे फडणवीस यांनी सांगितले. ठाकरे हे सोनियांच्या बैठकीला अनुपस्थित राहणार, याची पूर्वकल्पना भाजप नेत्यांना आहे का, असाही प्रश्न यातून उपस्थित होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com